nutmeg

जायफळाने टाळा निद्रानाशाची समस्या

  जायफळ हे गरम मसाल्यातील एक प्रमुख घटक. चिकन, मटणासारखे मांसाहारी पदार्थ असोत किंवा सणासुदीचे गोडाचे पदार्थ, ‘जायफळा’ शिवाय या पदार्थांना रंगतच नाही. पण पदार्थांची चव वाढवण्यासोबतच जायफळामध्ये काही औषधी गुणधर्मही आहेत. तज्ञांच्यामते, जायफळामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते, त्वचेची कांती सुधारते तसेच पचनाचे विकारही कमी होतात.

Mar 12, 2018, 10:36 PM IST

निद्रानाशावर जायफळ असे ठरते उपयुक्त

भारतीय खाद्यसंस्कृतीची खरी खासियत त्यात मिसळल्या जाणार्‍या मसाल्यांमध्ये आहे.  जायफळ आणि वेलचीने तर गोडाच्या पदार्थांची चव अधिकच वाढते. पदार्थ चविष्ट बनवण्यासोबतच जायफळामध्ये काही औषधी गुणधर्मदेखील आहेत. निद्रानाशाची समस्या दूर करण्यासाठी जायफळ अत्यंत उपयुक्त आहे. ‘ the Journal of Ethnopharmacology’च्या अहवालानुसार जायफळमुळे झोप येण्याची शक्यता वाढते तसेच तुम्हांला दीर्घकाळ शांत झोप मिळते. 

Sep 21, 2017, 11:49 PM IST