note ban

देशात नोटांचा तुटवडा 4 ते 5 महिने जाणवणार?

बॅंकेत आता 500 आणि 1000च्या नोटा बदलून मिळणार नाहीत. मात्र तरीही बॅकेबाहेरच्या रांगा कमी झालेल्या नाहीत. एटीएममधील पैसे संपल्यामुळे बॅंकेत यावे लागत आहे. परंतु बँकेतीलही पैसे संपत असल्यामुळे नागरिकांना पैसे काढण्यावर मर्यादा येत आहेत. दरम्यान, आणखी 4 ते 5 महिने नोटांचा तुटवडा भासेल, अशी माहिती बॅंक फेडरेशनने दिली आहे. त्यामुळे देशात नोटांचा तुटवडा जाणवणार आहे.

Nov 26, 2016, 11:51 AM IST

बेहिशेबी पैसे जमा करणाऱ्यांना मोदी सरकार देणार आणखी एक धक्का

मोदी सरकारने 8 नोव्हेंबरला देशात 500 आणि 1000 रुपयांच्या नोटाबंदी धोरण लागू केले. त्यामुळे चलनातून या दोन्ही नोटा रद्द झाल्यात. त्यामुळे अनेकांचे धाबे दणाणले. दरम्यान, या नोटा बॅंकेत भरण्याची मुदत देण्यात आली आहे. दरम्यान, नोव्हेंबर ते डिसेंबर या कालावधीत ज्यांनी बॅंकेत बेहिशेबी रक्कम भरली आहे, त्यावर कर आकारण्यात येणार आहे.

Nov 25, 2016, 11:45 AM IST

बाजारात 500 रुपयांच्या दोन वेगवेगळ्या नव्या नोटा

500 रुपयांच्या नव्या नोटांना बँक तसेच एटीएममध्ये येऊन दोन आठवडे होत नाहीत तोच बाजारात 500च्या दोन प्रकारच्या नोटा पाहायला मिळतायत. 

Nov 25, 2016, 11:43 AM IST

नोटबंदीमुळे संत्रा उत्पादक अडचणीत

सलग दुसऱ्या वर्षी नागपूरचा संत्रा उत्पादक अडचणीत आलेत. 500 आणि हजार रुपयाच्या नोटाबंदीमुळे संत्राउत्पादकांना संकटाचा सामना करावा लागत आहे. 

Nov 25, 2016, 11:30 AM IST

जुन्या नोटांना 30 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ?

नोटबंदीबाबत आज संध्याकाळी सरकार मोठी घोषणा कऱण्याची शक्यता आहे. सूत्रांच्या माहितीनुसार 500 आणि 1000च्या नोटा वापरण्याची मुदत वाढवली जाण्याची शक्यता आहे.

Nov 24, 2016, 03:37 PM IST

5 वर्षानंतर एक्स बॉयफ्रेंड बँकेंच्या रांगेत दिसला आणि...

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 500 आणि 1000च्या नोटा बंद झाल्याची घोषणा केल्यानंतर बँक आणि एटीएमबाहेर लोकांच्या मोठमोठ्या रांगा पाहायला मिळतायत.

Nov 24, 2016, 01:37 PM IST

नोटाबंदीचा निर्णय गरिबांना त्रासदायक, निर्बंधामुळे छोटे उद्योग अडचणीत - मनमोहन सिंग

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतलेल्या नोटाबंदीच्या मुद्यावर माझा विरोध नाही, मात्र त्यासाठी पूर्वतयारी करण्यात आली नव्हती. तसेच सरकारच्या या निर्णयाचा गरिबाला फटका बसतोय. छोटे व्यवसायिक अडचणीत आलेत. याचा परिणाम जीडीपीवर होणार आहे. हा परिणाम दोन टक्क्यांपर्यंत होईल, असे भाकीत माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी व्यक्त केला. 

Nov 24, 2016, 12:39 PM IST

नोटाबंदीमुळे या टीव्ही अभिनेत्याने आपले लग्न पुढे ढकलले

केंद्र सरकारने 500 आणि 1000च्या नोटांवर बंदी जाहीर केल्यानंतर याचा परिणाम सगळीकडेच पाहायला मिळतोय. 

Nov 24, 2016, 11:52 AM IST

नोटबंदीवरून विरोधकांचा विरोध कायम, लोकसभा-राज्यसभेत गोंधळ

नोटबंदीवरून विरोधकांनी सुरू केलेला विरोध संपलेला नाही. विरोधकांच्या भूमिकेमुळे संसदेचे कामकाज ठप्प आहे. आज सकाळी संसदेचे कामकाज सुरु झाले. यावेळी विरोधक पुन्हा आक्रमक दिसलेत. लोकसभा आणि राज्यसभेत गोंधळामुळे कामकाज थांबविण्यात आले आहे.

Nov 24, 2016, 11:31 AM IST

पश्चिम बंगालमधील जनधन खात्यांमध्ये सर्वाधिक रक्कम जमा

नोटाबंदीनंतर देशभरातील जनधन खात्यांमध्ये मोठया प्रमाणात रक्कम जमा झालीये. आतापर्यंत जनधन खात्यांमध्ये 21 कोटीहून अधिक रक्कम जमा झालेली आहे. विशेष म्हणजे पश्चिम बंगाल राज्यातील जनधन खात्यांमध्ये जमा झालेली रक्कम सर्वाधिक आहे.

Nov 24, 2016, 10:07 AM IST