पश्चिम बंगालमधील जनधन खात्यांमध्ये सर्वाधिक रक्कम जमा

नोटाबंदीनंतर देशभरातील जनधन खात्यांमध्ये मोठया प्रमाणात रक्कम जमा झालीये. आतापर्यंत जनधन खात्यांमध्ये 21 कोटीहून अधिक रक्कम जमा झालेली आहे. विशेष म्हणजे पश्चिम बंगाल राज्यातील जनधन खात्यांमध्ये जमा झालेली रक्कम सर्वाधिक आहे.

Updated: Nov 24, 2016, 10:07 AM IST
पश्चिम बंगालमधील जनधन खात्यांमध्ये सर्वाधिक रक्कम जमा title=

नवी दिल्ली : नोटाबंदीनंतर देशभरातील जनधन खात्यांमध्ये मोठया प्रमाणात रक्कम जमा झालीये. आतापर्यंत जनधन खात्यांमध्ये 21 कोटीहून अधिक रक्कम जमा झालेली आहे. विशेष म्हणजे पश्चिम बंगाल राज्यातील जनधन खात्यांमध्ये जमा झालेली रक्कम सर्वाधिक आहे.

रिपोर्टनुसार नोटाबंदीनंतरच्या कालावधीत जनधन खात्यातील रकमेत वाढ होत 66, 636 कोटी रुपये झालीये. यात पश्चिम बंगालमधील जनधन खात्यांमध्ये सर्वाधिक रक्कम जमा झाल्याची माहिती अर्थ मंत्रालयातील सूत्रांनी दिली. दरम्यान हा आकडा किती आहे याची माहिती मिळू शकलेली नाही.

नोटाबंदीच्या घोषणेनंतर 500 आणि 1000च्या रुपयांच्या जुन्या नोटा जमा करण्यास 30 डिसेंबरपर्यंतचा कालावधी देण्यात आलाय. यादरम्यान अनेक जण आपला काळा पैसा पांढरा कऱण्यासाठी जनधन खात्याचा वापर करताय. असा वापर करणाऱ्यांवर कडक कारवाईचे आदेश सरकारने दिलेत. 

खात्यात पैसे भरण्याची मर्यादा अडीच लाख रुपयांपर्यंत आहे तर जनधन खात्यामध्ये पैसे भरण्याची मर्यादा 50 हजार रुपयांपर्यंत आहे.