newstracker 0

प्रभूंना मिळालं वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय

केंद्रीय मंत्रीमंडळात मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. पियूष गोयल यांच्याकडे रेल्वे मंत्रालयाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तर माजी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांना वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय खातं सोपवण्यात आलं आहे.

Sep 3, 2017, 02:43 PM IST

निर्मला सीतारमन बनल्या देशाच्या दुसऱ्या महिला संरक्षण मंत्री

केंद्रीय मंत्रीमंडळात मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. अरुण जेटली यांच्याकडे असलेल्या संरक्षण खात्याची अतिरिक्त जबाबदारी काढून घेण्यात आली आहे. कॅबिनेट मंत्रीपदी बढती मिळालेल्या निर्मला सीतारमन देशाच्या नव्या संरक्षण मंत्री बनल्या आहेत. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यानंतर संरक्षण मंत्रीपदी वर्णी लागलेल्या निर्मला सीतारमन या दुस-या महिला ठरल्या आहेत.

Sep 3, 2017, 02:31 PM IST

मोदींच्या मंत्रिमंडळातील नव्या मंत्र्यांचे खातेवाटप जाहीर

पंतप्रधान मोदींच्या नव्या मंत्रीमंडळ विस्तारात ९ नव्या मंत्र्यांचा समावेश झाला आहे. शिवप्रताप शुक्ल, अश्विनीकुमार चौबे, विरेंद्र कुमार, अनंतकुमार हेगडे, राजकुमार सिंग, हरदीपसिंग पुरी, सत्यपाल सिंग, गजेंद्रसिंह शेखावत, अल्फोन्स कन्ननथानम यांनी राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली.

Sep 3, 2017, 02:10 PM IST

पंतप्रधान मोदींच्या मंत्रीमंडळात हे 'नवरत्न'

पंतप्रधान मोदींच्या नव्या मंत्रीमंडळ विस्तारात ९ नव्या मंत्र्यांचा समावेश झाला आहे. शिवप्रताप शुक्ल, अश्विनीकुमार चौबे, विरेंद्र कुमार, अनंतकुमार हेगडे, राजकुमार सिंग, हरदीपसिंग पुरी, सत्यपाल सिंग, गजेंद्रसिंह शेखावत, अल्फोन्स कन्ननथानम यांनी राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली.

Sep 3, 2017, 12:11 PM IST

उत्तर प्रदेशातल्या यादवीवर पंतप्रधान मोदींचं टीकास्त्र

समाजवादी पक्षात सध्या वाद सुरु आहेत. अखिलेश कुमार आणि काही वरिष्ठ नेत्यांमध्ये जमत नसल्याने पक्ष तुटण्याच्या मार्गावर आला आहे. याबाबतच आज सकाळी मुलायम सिंह यादव यांनी सर्व नेत्यांची बैठक बोलावली. 

Oct 24, 2016, 03:59 PM IST

यादवांच्या वादात काँग्रेसनं घेतली उडी

उत्तर प्रदेशातल्या यादवांच्या वादात आता काँग्रेसनंही उडी घेतलीय. अखिलेश सरकारच्या मदताली काँग्रेस धावून आली आहे. उत्तर प्रदेशातलं अखिलेश सरकार संकटात असेल तर मदत करणार असल्याची भूमिका काँग्रेसनं घेतलीय. 

Oct 24, 2016, 03:44 PM IST

समाजवादी पक्षाच्या बैठकीत मुलायम सिंह यादवांनी केलं मोदींचं कौतूक

लखनऊमध्ये आज समाजवादी पक्षाची महत्त्वाची बैठक पार पडली. बैठकीत समाजवादी पक्षाचे अध्यक्ष मुलायम सिंह यादव यांनी भाषण देतांना मुख्यमंत्री अखिलेश कुमार यांना सुनावलं. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कौतूक केलं.

Oct 24, 2016, 01:42 PM IST

अखिलेश यादवांनी दाखवली मुख्यमंत्रीपदाच्या राजीनाम्याची तयारी

समाजवादी पक्ष हा फूट पडण्याच्या मार्गावर दिसत आहे. आजचा दिवस हा समाजवादी पक्षाच्या दृष्टीने खूप मोठा दिवस असणार आहे. लखनऊमध्ये याबाबत एक महत्त्वाची बैठक सुरु झाली आहे. कोणत्याही क्षणी मुलायम सिंह यादव यांच्याकडून मोठा निर्णय घोषित होऊ शकतो.

Oct 24, 2016, 11:31 AM IST

समाजवादी पक्षात महाभारत : मुलायम यादव होणार मुख्यमंत्री ?

समाजवादी पक्षाची पुढची दिशा कशी असणार याचा निर्णय आज होणार आहे. आजचा दिवस समाजवादी पक्षाच्या दृष्टीने मोठा दिवस असणार आहे. पक्षामध्ये आज मुलायम सिंह यादव मोठा निर्णय घेऊ शकतात.

Oct 24, 2016, 11:13 AM IST