समाजवादी पक्षात महाभारत : मुलायम यादव होणार मुख्यमंत्री ?

समाजवादी पक्षाची पुढची दिशा कशी असणार याचा निर्णय आज होणार आहे. आजचा दिवस समाजवादी पक्षाच्या दृष्टीने मोठा दिवस असणार आहे. पक्षामध्ये आज मुलायम सिंह यादव मोठा निर्णय घेऊ शकतात.

Updated: Oct 24, 2016, 11:13 AM IST
समाजवादी पक्षात महाभारत : मुलायम यादव होणार मुख्यमंत्री ? title=

लखनऊ : समाजवादी पक्षाची पुढची दिशा कशी असणार याचा निर्णय आज होणार आहे. आजचा दिवस समाजवादी पक्षाच्या दृष्टीने मोठा दिवस असणार आहे. पक्षामध्ये आज मुलायम सिंह यादव मोठा निर्णय घेऊ शकतात.

मुलायम यादव हे त्यांच्या मुलाला म्हणजेच मुख्यमंत्री अखिलेश यादव यांना पक्षातून काढू शकता. अशा स्थितीत अखिलेश यादव नवा पक्ष स्थापन करतील असं देखील आधीपासूनच चर्चा सुरु झाल्या आहेत. प्रोग्रेसिव समाजवादी पार्टी असं नाव देखील चर्चेत आहे आणि मोटरसाकल हे पक्षचिन्ह असेल अशी देखील चर्चा अखिलेश यादव यांच्या समर्थकांमध्ये सुरु आहे.

समाजवादी पक्षात 'गृहयुद्ध' सुरु झालं आहे. रविवारी हा वाद वाढला त्यावर मुलायम सिंह यादव यांनी सोमवारी निर्णय घेऊ असं म्हटलं. सोमवारी सकाळी वरिष्ठ नेत्यांसोबत बैठक सुरु झाली. आता काय निर्णय होतो. पक्षाबाजून निर्णय घेणार की मुलाच्या बाजूने याबाबत अनेकांना उत्सूकता लागली आहे. असं देखील म्हटलं जातंय की, मुलायम सिंह यादव हे स्वत: मुख्यमंत्रीपदी विराजमान होऊ शकतात.

राजकीय तज्ज्ञांचं म्हणणं आहे की, पक्ष अध्यक्षाच्या रूपात जर ते मुलासोबत जातात तर भाऊ शिवपाल यादव आणि विश्वासू अमर सिंह यांचा त्याग करावा लागेल. अखिलेश यादव या दोन्ही नेत्यांच्या विरोधात आहेत.

मुलायम सिंह यादव हे आगामी निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर पक्षात सुरु असलेला वाद संपवण्याचा प्रयत्न करतील. त्यामुळे एकीकडे एकनिष्ठ नेते तर दुसरीकडे मुलगा या कोंडीतून मुलायम सिंह यादव यांना मार्ग काढावा लागणार आहे. त्यामुळे ते स्वत:च जर मुख्यमंत्री झाले तरच त्यांना यातून मार्ग काढता येणार आहे.