marathi language

२१ अधिकाऱ्यांना दणका, आधी मराठी शिका! मगच...

महाराष्ट्रात राहणाऱ्यांना आणि काम करणाऱ्यांना मराठी येणे आवश्यक आहे, ही काही राजकीय पक्षांची मागणी योग्य आहे. हे आता अधोरेखीत झाले आहे. राज्यात प्रशासकीय काम करणाऱ्या २१ आयपीएस अधिकाऱ्यांना मराठी न आल्याने त्याचा फटका बसला आहे. आधी मराठी शिका मगच पगार, असे स्पष्ट बजावत या अधिकाऱ्यांना दणका दिलाय.

Jul 31, 2013, 10:43 AM IST

अमराठी भाषिकांना पुणे विद्यापीठाची साथ

अमराठी भाषकांना मराठी भाषा शिकण्यासाठी पुणे विद्यापीठाने पुढाकार घेतला आहे. मराठी शिकविण्यासाठी त्यांना साथ देण्याचे ठरविले आहे. त्यासाठी खास अभ्यासक्रम सुरू केला आहे.

Jun 4, 2013, 07:45 PM IST

झी २४ तासच्या बातम्या आता तुमच्या बोलीभाषेत

महाराष्ट्रातील आघाडीची वृत्तवाहिनी असलेल्या ‘झी 24 तास’वर जागर बोलीभाषेचा हा अनोखा उपक्रम सुरु करण्यात आला असून दर बुधवारी एका बोलीभाषेतून त्या भागातील बातम्या प्रक्षेपित करण्यात येणार आहेत. या बुधवारी मालवणी भाषेतून या उपक्रमाची सुरुवात होणार असून गणपती उत्सवाच्या तयारीत दंग असलेल्या मालवणी मुलखातील खबरबात खास मालवणी बोलीतील बातम्यांमधून सादर केली जाणार आहे.

Sep 11, 2012, 11:53 PM IST

प्रियंका चोप्राही शिकणार 'मराठी'!

‘स्वीटी’च्या आणि ‘काली’च्या भूमिकेत बघितल्यावर अजूनही तिचे फॅन्स तिला मराठी मुलीच्या भूमिकेत पाहण्यास उत्सुक आहेत. या सगळ्या गोष्टींचा विचार करून ‘युपी’च्या प्रियंकाने आता कामचलाऊ मराठी न बोलता नीट मराठी शिकण्याचा निर्णय घेतला आहे.

Jan 31, 2012, 06:29 PM IST