maratha reservation protest

मराठा आरक्षण मिळाल्यानंतरही स्वस्थ बसणार नाही, मनोज जरांगे 'ही' मोहीम घेणार हाती

Maratha Reservation: मराठा आरक्षणासाठी येत्या 20 जानेवारीला मुंबई गाठणार असल्याचं मनोज जरांगे पाटील यांनी जाहीर केलं आहे. एकदा गाव सोडलं तर आरक्षण घेऊनच येऊ असा इशाराही मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिला आहे. 

 

Jan 5, 2024, 08:52 PM IST

24 डिसेंबरची डेडलाईन वाढवून मिळणार? सरकारची विनंती, मनोज जरांगे म्हणतात आता...

मराठा आरक्षणप्रकरणी मनोज जरांगे यांनी सरकारला दिलेली डेडलाईन येत्या 24 डिसेंबरला संपणार आहे. 24 तारखेनंतर एक तासही वाढवून मिळणार नसल्याचं जरांगेंनी सांगितलं आहे. तसंच 23 डिसेंबरला बीडमध्ये इशारा सभेचंही आजोजन करण्यात आलं आहे. 

Dec 18, 2023, 07:19 AM IST

'आरक्षण मर्यादा वाढवून आरक्षण नकोच' ओबीसीतूनच आरक्षणावर जरांगे ठाम

Maratha Reservation : मनोज जरांगे-पाटील यांनी पुन्हा एकदा ओबीसीतून आरक्षण हवं या मागणीवर जोर दिलाय. तसंच या अधिवेशनात मराठा आरक्षणाचा कायदा पास करा नाहीत तर तुमची गय नाही असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. 

Dec 6, 2023, 08:22 PM IST

'राज्यात मराठा शिल्लकच राहणार नाही' - मंत्री छगन भुजबळ यांचा दावा

Maratha vs OBC Reservation : राज्य सरकारने दाखल केलेल्या क्युरेटीव्ह पिटीशनवर सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार असून यावर मराठा आरक्षणाचं भवितव्य अवलंबून आहे. दरम्यान, राज्यात मराठा शिल्लक राहणार नाही असा दावा मंत्री छगन भुजबळ यांनी केला आहे. 

Dec 6, 2023, 02:42 PM IST

'कलंक लागलेला, दंगली भडकवणारा, वाया गेलेला छगन भुजबळ' मनोज जरांगेंचा हल्लाबोल

Maratha Reservaiton : मनोज जरांगे पाटील यांची जालना शहरात भव्य जाहीर सभा झाली. यााधी जरांगेंवर जेसीबीमधून फुलांची उधळण करण्यात आली. या सभेच्या माध्यमातून जरांगे पाटील यांनी महाराष्ट्र दौऱ्याच्या चौथ्या टप्प्याला  सुरूवात  केली आहे. 

Dec 1, 2023, 08:07 PM IST

'काँग्रेस सरकार टिकलं असतं तर मराठा आरक्षण...' पृथ्वीराज चव्हाण यांचं मोठं वक्तव्य

Maratha Reservation : काँग्रेस सरकार टिकलं असतं तर मराठा आरक्षणही टिकलं असतं असं मोठं विधान माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलं आहे. यावर सत्ता गेली म्हणून आरक्षणही गेलं हे न पटणारं विधान असल्याचं राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे यांनी केलं आहे. 

Nov 28, 2023, 04:28 PM IST

Marathwada Water Issue : मराठवाड्याचं पाणी आरक्षणानं रोखलं, मराठा आंदोलकांच्या बदनामीचा डाव?

Marathwada vs North Maharashtra: मराठवाड्याला पाणी सोडण्यावरून आधीच वाद पेटलेला (Marathwada Water Dispute) असताना आता या वादाला आरक्षणाचं ग्रहण लागलंय. जायकवाडीच्या पाण्यासंदर्भात अधीक्षक अभियंत्यांनी लिहिलेल्या पत्रानं खळबळ उडालं. तर दुसरीकडे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनीही यांनी यानिमित्तानं सरकारवर निशाणा साधलाय. 

Nov 24, 2023, 08:55 PM IST

'भुजबळांचं सर्व माहितीय' बालेकिल्ल्यात मनोज जरांगेंचा गौप्यस्फोट

Maratha Reservation : मनोज जरांगे यांच्या राज्यव्यापी दौऱ्याचा आजचा 8 वा दिवस आहे. नाशिकला त्र्यंबकेश्वरमध्ये दर्शन घेऊन जरांगेंनी आजच्या दिवसाची सुरुवात केली. मंत्री छगन भुजबळांच्या नाशिक जिल्ह्यात 2 सभा घेऊन जरांगेंनी जोरदार शक्तिप्रदर्शन केलं

Nov 22, 2023, 06:27 PM IST

जातींत तेढ निर्माण करुन सरकारला दंगली घडवायच्या आहेत? मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात मनोज जरांगेंचा सवाल

Maratha Reservation : जातीत तेढ नर्माण करुन सरकारला दंगली घडवायच्या आहेत का असा सवाल मनोज जरांगे पाटील यांनी विचारला आहे. मुख्यंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यात मनोज जरांगे यांची सभा झाली. त्यावेळी त्यांनी सरकारवर आरोप केला आहे. 

Nov 21, 2023, 01:49 PM IST

भुजबळ विरुद्ध जरांगे वाद पेटला, मराठा विरुद्ध ओबीसी संघर्ष वाढणार?

Marath vs OBC Reservation : मनोज जरांगे विरुद्ध छगन भुजबळ यांच्यातला वाद चांगलाच चिघळलाय... जालन्यातल्या सभेत भुजबळांनी जरांगेंवर जोरदार हल्ला चढवला... तर आपल्या पश्चिम महाराष्ट्रातील दौऱ्यात जरांगेंनी भुजबळांचा खरपूस समाचार घेतला..

Nov 19, 2023, 08:14 PM IST

मराठा आरक्षण आंदोलन काळात मुलगी झाली, दाम्पत्याने मुलीचं नाव ठेवलं...

Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी राज्यात ऐतिहासिक आंदोलन झालं.  या मराठा आरक्षण आंदोलनाची आठवण म्हणुन नांदेड जिल्ह्यातील एका दाम्पत्याने आपल्या मुलीचं अनोखं नाव ठेवलं आहे. 

Nov 4, 2023, 05:07 PM IST

दोन सख्खे भाऊ, एक कुणबी-एक मराठा, मनोज जरांगेंचा दावा खरा ठरला

Maratha Reservation : कुणबी-मराठा एकच या मनोज जरांगे पाटील यांच्या दाव्याला बळ मिळालंय, तसे पुरावेही सापडलेत. दरम्यान, मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला 2 महिन्यांची वेळ वाढवून दिली आहे. 

Nov 2, 2023, 08:19 PM IST

सरकारला 2 जानेवारीपर्यंतचा अल्टिमेटम, मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण मागे

Maratha Reservation : मराठा आरक्षणाबाबत सरकारच्या शिष्टमंडळाची मनोज जरांगेंसोबत सकारात्मक चर्चा झाली. जरांगेंच्या मागण्यांची नोंद घेण्यात आली.मंत्र्यांचं शिष्टमंडळानेही जरांगेंची भेट घेतली. 

Nov 2, 2023, 07:41 PM IST

मराठा आरक्षणासाठी मंत्रालयाच्या गेटला आमदारांनीच ठोकलं टाळं

मराठा आरक्षण मिळेपर्यंत पाणी पिणार नाही. जे होईल त्याची जबाबदारी सरकारची असेल, असा निर्वाणीचा इशारा मनोज जरांगे पाटलांनी दिला आहे. 6 कोटी मराठ्यांवर केसेस दाखल करणार का? असा तिखट सवालही त्यांनी सरकारला केला. 

Nov 1, 2023, 10:51 PM IST

मराठा आरक्षणाचा राग लालपरीवर! मराठवाड्यात 85 बसेसची मोडतोड-जाळपोळ; 4 कोटींचे नुकसान

Maratha Reservation: गेल्या 3 ते 4 दिवसापासून मराठवाड्यातील परभणी, धाराशीव, लातूर, जालना, नांदेड या जिल्ह्यातील सर्व एसटी वाहतूक बंद आहे.

Oct 31, 2023, 12:14 PM IST