mahavikas aghadi

लोकसभेसाठी मनसे कामाला, टेन्शन कुणाला? 'या' 20 मतदार संघात उमेदवार देणार

लोकसभा निवडणूक 2024 महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्वबळावर लढवणार असल्याचं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जाहीर केलंय. त्यानुसार मनसेने लोकसभा निवडणुसाठी कंबर कसली आहे. राज्यात तब्बल 20 जागांवर मनसे उमेदवार देण्याची चर्चा असून त्यादृष्टीने तयारीसुद्धा सुरु केली आहे. 

Nov 21, 2023, 06:49 PM IST

जागावाटपावरून महाविकास आघाडीत बिघाडी? काँग्रेसकडून अतिरिक्त जागांची मागणी

Maharashtra Politics : लोकसभा निवडणुकीला आाता एक वर्षाहून कमी कालावधी राहिला आहे. महायुती आणि महाआघाडीत जागावाटपावरुन रणनिती सुरु आहे. पण संभाव्य जागावाटपावरुन मविआत काँग्रेस एकाकी पडलीय, पवार-ठाकरेंकडे काँग्रेसनं अतिरिक्त जागांची मागणी केलीय..

Nov 16, 2023, 08:25 PM IST

ममता बॅनर्जी यांनी उद्धव ठाकरे यांना बांधली राखी, मातोश्रीवर असं झालं स्वागत

Mamta Banerjee : संपूर्ण देशभरात रक्षाबंधनाचा सण मोठ्या उत्साहात साजरा होतोय. मुंबईत दौऱ्यावर आलेल्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी रक्षाबंधन सणाच्या निमित्ताने मुंबईत ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि अभिनेते अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांना राखी बांधली.

Aug 30, 2023, 11:44 PM IST

'भ्रष्टाचाराच्या आरोपाची चौकशी करावी', शरद पवारांचं मोदी आणि शाह यांना आव्हान

मुंबईत विरोधकांची आघाडी असलेल्या इंडियाची बैठक होत आहे, या बैठकीसाठी विरोधी पक्षाचे नेते मुंबईत दाखल व्हायला सुरुवात झाली आहे. यापार्श्वभूमीवर मुंबईत मविआची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत मोदी सरकारवर हल्लाबोल करण्यात आला. 

Aug 30, 2023, 04:20 PM IST

अजितदादा कोणाचे? शरद पवारांची गुगली, महाविकास आघाडीत पुन्हा संभ्रम

Maharashtra Politics : अजित पवार आमचेच नेते आहेत, असं वक्तव्य शरद पवारांनी केल्यानं महाविकास आघाडीत पुन्हा संभ्रम निर्माण झालाय. शरद पवारांच्या गुगलीनंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Aug 25, 2023, 08:19 PM IST

मविआत जागावाटपाचं सूत्र ठरलं? महायुतीला रोखण्यासाठी 'सुपर प्लॅन' तयार

भाजपला रोखण्यासाठी महाविकास आघाडी एकत्र आली. मात्र लोकसभेच्या जागावाटपावरुनच मविआचं घोडं अडलं होतं. तीन पक्ष एकत्र असल्याने जागा वाटपात तडजोड करावी लागणार होती.  आघाडीत बिघाडी होण्याची चिन्ह होती.  मात्र भाजपला रोखण्यासाठी मविआने आता वज्रमुठ आवळलीय.

Aug 18, 2023, 07:54 PM IST

सोबत आले तर ठिक नाही तर! काका-पुतण्या भेटीवर नाराजी.. काँग्रेस-ठाकरे गटाचं 'या' गोष्टीवर एकमत

शरद पवार आणि अजित पवार यांच्या पुण्यातील भेटीवरुन आता राजकारणाला वेग आला आहे. या भेटीमुळे महाविकास आघाडीत नाराजीचं वातावरण आहे. भविष्यात शरद पवार सोबत आले नाहीत, तर काय करायचं याचा निर्णय आता ठाकरे गट आणि काँग्रेसने घेतला आहे. 

Aug 15, 2023, 02:02 PM IST

नीलम गोऱ्हे उपसभापतीपदावर कायम राहणार, विरोधकांना धक्का... पाहा कायदा काय सांगतो?

विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी शिंदे गटात प्रवेश केला. त्यानंतर महाविकास आघाडीने नीलम गोऱ्हे यांना उपसभापती पदावरून हटवण्याची राज्यपालांकडे मागणी केली होती. यावरुन अधिवेशवात विरोधकांनी गोंधळही घातला. पण विरोधकांच्या या मागणीला धक्का बसला आहे. 

Jul 20, 2023, 05:26 PM IST
There could be tough fight over Amravati Constituency in Mahavikas Aghadi PT1M15S

Amravati Constituency | अमरावती मतदारसंघावरुन महाविकास आघाडीत वाद?

There could be tough fight over Amravati Constituency in Mahavikas Aghadi

Jul 10, 2023, 01:00 PM IST