पावसाचा दणका, मुंबई-गोवा महामार्गावर दरड कोसळली
Jul 11, 2014, 02:48 PM ISTमाळशेज घाटातील वाहतूक बंदच
माळशेज घाटात पुन्हा दरड कोसळली आहे. कालच ८ दिवसांनंतर घाटातून एकेरी वाहतूक सुरू झाली होती. मात्र आज पुन्हा दरड कोसळल्यानं वाहतूक बंद झालीय. या ठिकाणी शनिवार, रविवार कोणीही फिरायला येऊ नका, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
Aug 2, 2013, 01:24 PM ISTमाळशेज घाटातून एकेरी वाहतूक सुरू
कल्याण-अहमदनगर महामार्गावरील माळशेज घाटातील वाहतूक आठ दिवसानंतर सुरू झाली आहे. काहीप्रणात दरड हटविण्यात राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाला यश आलेय. त्यामुळे माळशेज घाटातून एकेरी वाहतूक सुरू करण्यात आली आहे. अद्याप हा घाट धोकादायक आहे.
Aug 1, 2013, 10:05 AM ISTदरड कोसळल्याने माळशेज घाट बंद
माळशेज घाटात दरड कोसळलीय. त्यामुळे माळशेज घाट दोन तासाभरापासून बंद पडलाय. घाटातील वाहतूक ठप्प पडलेय. दरड कोसळल्याने मोठे दगड रस्त्यावर आले आहेत. त्यामुळे ही दरड दूर करण्यात मोठा अडथळा येत आहे.
Jul 25, 2013, 12:47 PM ISTवडाळ्यातील दुर्घटनेला जबाबदार कोण?
वडाळ्यात दरड कोसळून दोन जणांचे बळी गेले. वेळेवर उपाययोजना केल्या असत्या तर ही दुर्घटना घडली नसती. मुख्यमंत्र्यांनी इथल्या रहिवाशांच्या पुनर्वसनाचे आदेश देऊनही, ते गांभीर्यानं घेण्यात आले नाहीत.
Jul 11, 2013, 05:57 PM ISTपाऊस ओसरला, पण चाकरमान्यांचे हाल सुरूच
मुंबईत आता जरी पावसाचा जोर काहीसा ओसरला आहे. तरीही समुद्रातील भरती-ओहोटीकडे सगळ्यांचं लक्ष आहे. दुपारी 2 वाजून 12 मिनिटांनी भरती येणार आहे. या वेळी लाटांची सरासरी उंची 4.01 मीटर असेल, तर ओहोटी रात्री 8:16 मिनिटांनी असेल. मुंबई अहमदाबाद महामार्गावर दरड कोसळ्यानं वाहतूक ठप्प झालीय.
Sep 4, 2012, 11:31 AM IST