kidnapping

मराठवाड्यात अपहरणकर्त्यांची टोळी सक्रिय?

परभणी रेल्वे स्टेशनवरून दोन मुलांना पळवण्याचा प्रयत्न करणा-या भामट्यांचा कट पोलिसांनी उधळून लावला. वसईच्या रेल्वे स्टेशनवरून सहा जणांनी शेख अझीम आणि जितेंद्र प्रजापती या मुंबईतल्या कोळीवाड्यात राहणा-या दोन मुलांचं अपहरण केलं.

Jul 12, 2012, 04:23 PM IST

नक्षलवाद्यांची अपहरणनीती

शेतमजूर, कष्टकरी,दबल्या पिचलेल्या वर्गाच्या हक्कासाठी पश्चिम बंगालच्या नक्षलबारी या खेड्यातून एक चळवळ सुरु झाली....आणि पहाता पहाता ती चळवळ अनेक राज्यात जाऊन पोहोचली. नक्षलबारी - नक्षलवादी असा प्रवास नक्षवादी चळवळीने केलाय.

Apr 26, 2012, 11:45 PM IST

ठाण्यात ठाकरे पॅटर्न, नवा महापौर सेनेचाच!

अखेर शिवसेनेने ठाणं राखलं. शिवसेनेचे हरिश्चंद्र पाटील ठाण्याचे नवे महापौर म्हणून निवडून आले आहेत. पाटील यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार नजीब मुल्ला यांचा पराभव केला. हरिश्चंद्र पाटील यांना ७३ मते मिळाली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने शिवसेनेला जाहीर पाठिंबा दिल्याने मनसेच्या सात नगरसेवकांनी युतीच्या बाजुने मतदान केलं तर सेना-भाजपकडे ६६ इतकं संख्याबळ आधीपासून होतं.

Mar 7, 2012, 08:28 AM IST

उद्धव यांनी घातलं राजसमोर लोटांगण- आव्हाड

ठाण्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने जाहीरपणे शिवसेनेला पाठिंबा दिल्यामुळे सेना-भाजप युतीचा महापौर होणार आहे हे निश्चित झालं आहे. गेले दोन-तीन दिवस भाजप नगरसेविका सुहासिनी लोखंडे गायब झाल्या होत्या त्यावरुन सेना-भाजपने ठाणे बंद आणि महामोर्चा तसंच न्यायालयीन लढाई आणि हिंसक मार्गांचाही अवलंब केला त्या सुहासिनी लोखंडे अखेर सभागृहात अवतरल्या आहेत.

Mar 6, 2012, 07:26 PM IST

अपहृत नगरसेविका महाबळेश्वरला

ठाण्यातील दोन अपहृत नगरसेविका अखेर महाबळेश्वर येथे सापडल्या असून त्या दुपारी होणाऱ्या महापौरपदाच्या निवडणुकीत सहभागी होणार असल्याची माहिती अपहृत नगरसेविका अनिता किणे यांचे पती राजन किणे यांनी झी २४ ला माहिती दिली.

Mar 6, 2012, 04:54 PM IST

सुहासिनी लोखंडे अखेर ठाणे मनपामध्ये हजर

ठाण्यातील अपहृत नगरसेविका सुहासिसिनी लोखंडे अखेर ठाणे महानगरपालिकेच्या सभागृहात दाखल झाल्या आहेत. त्या महाबळेश्वरला असल्याची माहिती काहीवेळापूर्वीच 'झी २४ तास'ला देण्यात आली होती.

Mar 6, 2012, 04:12 PM IST

पत्नीचे अपहरण, किणेंचा आत्महत्येचा इशारा

ठाण्यात आज महापौरपदाची निवडणूक होत आहे. यातच अपहरणानाट्यामुळं गाजलेल्या निवडणुकीत कोण बाजी मारणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. बंडखोर आणि मनसेच्या भूमिकेकडं लक्ष लागले असताना भाजप नगसेविकेच्या अपहरणनाट्याची घटना ताजी असताना काँग्रेसच्या नगरसेविका बेपत्ता झाल्याने राजकारण तापले आहे. दरम्यान, ठाण्यातील काँग्रेसचे नगरसेवक राजन किणे यांनी आत्महत्या करण्याचा इशारा दिला आहे.

Mar 6, 2012, 01:12 PM IST

स्थायी सभापतींवर अपहरणाचा आरोप !

कोल्हापूर महापालिकेचे स्थायी समिती सभापती शारंगधर देशमुख यांनी आपल्या मुलाचं अपहरण करुन एक कोटी रुपयांची खंडणी उकळल्याची तक्रार सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब पोतदार यांनी केली आहे.

Feb 4, 2012, 05:01 PM IST

कफ परेडला मुलांच्या अपहरणाचा प्रयत्न

मुंबईतल्या कफ परेड भागातल्या दोन मुलांच्या अपहरणप्रकरणी पोलिसांनी एका महिलेला ताब्यात घेतलं आहे. मात्र एक आरोपी फरार झाला आहे.

Jan 22, 2012, 08:42 AM IST

खंडणीखोर पोलीस अडीच वर्षांनंतरही मोकाटच!

जिल्हा परिषदेच्या सदस्याकडून ६० लाखांची खंडणी मागून अपहरण करणारे चाळीसगावचे अतिरिक्त पोलीस अधिक्षक मनोज लोहार अडीच वर्षांनंतरही मोकाटच आहेत. इतकंच नव्हे तर या प्रकरणातून अपहरणाचं कलमच काढण्यात आलं आहे.

Jan 14, 2012, 06:05 PM IST

अल्पवयीन मुलीचे अपहरण करून बलात्कार

मुंबईमध्ये अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार झाल्याचं उघड झालयं.

Nov 15, 2011, 10:19 AM IST

अकोल्यात अपहरणाचा प्रयत्न

अकोल्यात कॉलेज विद्यार्थ्याच्या अपहरणाचा प्रयत्न रात्री १.३० वाजण्याच्या सुमारास करण्यात आला.

Nov 1, 2011, 01:52 AM IST