heart attack

शेंगदाणे खाल्ल्यामुळे २ वर्षीय मुलाला हार्ट अॅटॅक

साधारणतः वयाच्या चाळिशीनंतर माणसाला हृदयासंबंधीचे विकार सुरू होतात. मात्र मुंबईमध्ये अवघ्या दोन वर्षांच्या मुलाला हार्ट अटॅक आला आहे आणि या अटॅकचं कारण आहे शेंगदाणा.ही घटना ३० जुलैला घडली.

Aug 13, 2013, 04:24 PM IST

हार्टअटॅकचा अलर्ट देणार... स्मार्टफोन!

विचार करा, जर हृदयविकाराचा झटका येण्यापूर्वी तुम्हाला त्याची पूर्वकल्पना मिळाली तर? होय... हे शक्य आहे. नुकत्याच तयार करण्यात आलेल्या एका संशोधनात्मक तंत्रज्ञानामुळे तुमचा स्मार्टफोन तुम्हाला हृदयविकाराचा झटका येण्याअगोदरच अलर्ट करू शकेल.

Jun 25, 2013, 01:40 PM IST

पुरूष आणि महिलांच्या हृदयात फरक!

जेव्हा पुरुषांना हृदयविकाराचा झटका येतो तेव्हा छातीपासून डाव्या हातापर्यंत वेदना सरकत जातात. तर महिलांना हृदयविकाराचा झटका येतो, तेव्हा छातीपासून पोटाकडे वेदना सरकतात.

Jun 16, 2013, 06:52 PM IST

प्रशांत दामले यांना हृदयविकाराचा झटका

मराठी अभिनेते प्रशांत दामले यांना शुक्रवारी हृदयविकाराचा सौम्य झटका आला. डॉक्टरांनी मात्र प्रशांत दामले यांची प्रकृती स्थिर असल्याचं म्हटलंय. पण, या बातमीमुळे त्यांच्या चाहत्यांना मात्र प्रचंड धक्का बसला होता.

May 10, 2013, 11:55 PM IST

टोमॅटो खा... हार्ट अटॅकचा धोका टाळा...

टोमॅटो खायला तुम्हाला आवडत असेल आणि त्यांचा तुमच्या आहारात चांगलाच वापरही होत असेल तर त्याचा अर्थ आहे तुम्हाला हार्ट अटॅकचा धोका कमी आहे. होय... असा दावा केलाय फिनलँडच्या संशोधकांनी..

Oct 9, 2012, 05:41 PM IST

कॅप्टन लक्ष्मी सहगल यांचे निधन

सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद सेनेतील कॅप्टन लक्ष्मी सहगल (९७ ) यांचे कानपूरमध्ये ११.२० मिनिटाने निधन झाले. हदयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्यांना गुरुवारी कानपूर मेडिकल सेंटर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याचा शव मेडिकल कॉलेजला दान करण्यात आला आहे.

Jul 23, 2012, 01:39 PM IST

भाज्या आणि फळं वाचवतात हृदय

डब्लूएचओच्य़ा नव्या अभ्यासानुसार रोज फळं आणि भाज्या खाण्याच्या सवयीमुळे हृदयरोगाचा धोका २० टक्क्यांनी कमी होतो. रोज जंक फूड खाण्याने मात्र हृदयरोगाने मृत्यू पावणाऱ्यांची संख्या दुप्पट झाली आहे.

Jul 8, 2012, 09:49 AM IST

ट्रॅफिकच्या गोंगाटामुळे हृदयविकाराचा झटका!

ट्रॅफिकचा गोंगाट जीवघेणा ठरू शकतो, असं नुकत्याच एका संशोधनातून समोर आलं आहे. ट्रॅफिकमधील गोंगाटामुळे हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. पब्लिक लायब्ररी ऑफ सायंस वननुसार डॅनिश कँसर सोसायटीच्या मेटी सोनेंसेन यांच्या अध्यक्षतेखाली केल्या गेलेल्या संशोधनातून वरील निष्कर्ष काढण्यात आला आहे.

Jun 30, 2012, 06:06 PM IST

एकटेपणा बेतू शकतो जीवावर

एकटं राहणं हे किती धोकादायक असू शकतं? ते तुम्हाला मरणाच्या दारापर्यंत पोहचवू शकतं का? तर याचं उत्तर आहे... होय. एकटं राहणं हे तुमच्या जीवावर बेतू शकतं. त्यातूनही स्ट्रोक आणि हार्ट पेशंटना हे जास्त धोकादायक ठरू शकतं, असं नुकत्याच एका अभ्यासात म्हटलं गेलंय.

Jun 19, 2012, 03:03 PM IST

उजेड दूर करतो हृदयविकाराचा धोका

शास्त्रज्ञांनी हृदरोगावर नवा उपाय शोधून काढला आहे. शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे की जास्त प्रकाश हृदरोगापासून बचाव करतो. शास्त्रज्ञांचं मत आहे, की मानवी शरीराच्या जैविक घड्याळाचा संबंध उजेड अंधाराशी असतो. हे जैविक घड्याळ मेंदुतील प्रथिनांमुळे निश्चित होत असते.

Apr 29, 2012, 07:07 PM IST

झोपला नाहीत तर कायमचे झोपाल

तुम्ही झोप घेण्यासाठी टाळाटाळ करत असाल किंवा रात्री उशिरा जागरण करत असाल तर ते तुमची कायमची झोप उडवणारे ठरेल. पुरेशी झोप मिळाली नाही तर तुम्हाला रोगाने पछाडले समजा. तुम्ही हृदविकाराबरोबर मधुमेहाचे शिकारी व्हाल. त्यामुळे ही दुखणं जीव घेणं ठरू शकेल. त्यामुळे झोपेबाबत खबरदारी घेतली पाहिजे.

Feb 7, 2012, 06:20 PM IST

'देवा' आनंद हरपला.......

ज्येष्ठ कलाकार, प्रसिद्ध अभिनेते देवानंद यांचे आज लंडन येथे ह्रदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. लंडन येथे चेकअप साठी गेले असता देवानंद यांना हद्यविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यातच त्यांचे निधन झाले.

Dec 4, 2011, 07:00 AM IST