www.24taas.com, लंडन
टोमॅटो खायला तुम्हाला आवडत असेल आणि त्यांचा तुमच्या आहारात चांगलाच वापरही होत असेल तर त्याचा अर्थ आहे तुम्हाला हार्ट अटॅकचा धोका कमी आहे. होय... असा दावा केलाय फिनलँडच्या संशोधकांनी..
टोमॅटो खाल्याने हार्टअटॅकचे प्रमाण कमी होतो, असं आता एका नव्या शोधात समोर आलंय. फिनलँडच्या संशोधकांनी टोमॅटोमध्ये ‘लाइकोपीन’ नावाचे अॅन्टीऑक्सिडेन्ट मिळतं असा शोध लावलाय. ज्या माणसांमध्ये ‘लाइकोपीन’चे प्रमाण जास्त असते त्यांना हार्ट अटॅकचा ५५ टक्के धोका कमी असतो.
या संशोधनात ४६ ते ६५ वर्षाच्या १०३१ पुरूषमंडळी सहभागी झाले होते. सुरूवातीला या सर्वांच्या शरिरातील लाइकोपीवनचं प्रमाण मोजण्यात आलं आणि मग १२ वर्षांपर्यंत याचा अभ्यास करण्यात आला. अभ्यास सुरू असताना ६७ जणांना ह्रदयविकाराचा झटका आला. ज्यांच्या शरिरात लाइकोपिनचे प्रमाण कमी होते अशा २५ लोकांनी हार्ट अटॅकची तक्रार नोंदवली. काही व्यक्तींमध्ये लाइकोपीनचे प्रमाण जास्त होते अशा व्यक्तींमध्ये हार्ट अटॅकचे प्रमाण तब्बल ५९ टक्यांनी कमी झालं होतं.
ईस्टर्न फिनलँड विश्वविद्यालयाचे जॉनी कॉर्पी यांच्या म्हणण्यानुसार, फळं-भाज्या खाल्ल्याने हार्ट अटॅकचा धोका कमी होतो. हे संशोधन ‘न्यूरोलॉजी’मध्येही प्रकाशित करण्यात आलंय.