gas

गुड न्यूज : पेट्रोल आणि गॅसच्या दरांत कपात

दरवाढीच्या बातम्या सतत कानी पडत असताना पेट्रोल आणि गॅस स्वस्त झाल्याची बातमी आली की सर्वसामान्य माणसाइतका आनंद खचितचं कुणाला होतं असेल. त्यात काल एक एप्रिल असताना पेट्रोल-गॅस स्वस्त झाल्याची बातमी आली तर त्यावर विश्वास बसणं कठीणच होतं. पण, ही बातमी खरी आहे.

Apr 2, 2013, 09:12 AM IST

गॅस ३७ रुपयांनी स्वस्त

विनाअनुदानित गॅस सिलिंडर ३७.५० पयांनी स्वस्त झाले आहे. यामुळे ९ सिलिंडरचा कोटा संपलेल्या ग्राहकांना याचा लाभ होणार आहे.

Mar 3, 2013, 10:33 AM IST

दिवाळीपूर्वी भडका, २६ रुपयांनी गॅस महाग!

विना अनुदानित घरगुती गॅस दरात आज सरकारने २६ रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे बाजारात आता गॅस सिलिंडरसाठी एक हजाराच्या घरात पैसे मोजावे लागण्याची शक्यता आहे.

Nov 1, 2012, 07:53 PM IST

आनंदवन ‘गॅस’वर...

एका कुटुंबाला एका वर्षात फक्त सहा सिलिंडरवर अनुदान देण्याचा निर्णय केंद्र सरकारनं नुकताच घेतलाय. या निर्णयामुळं एकत्र राहणाऱ्या कुटुंबांचं कंबरडचं मोडलंय. याचा फटका जसा सामान्य माणसाला बसलाय तसाच आनंदवनसारख्या सामाजिक प्रकल्पांनाही बसलाय.

Oct 3, 2012, 08:53 AM IST

वाढता वाढता वाढे... इंधनाची दरवाढ

महागाईनं हैराण झालेल्या सर्वसामान्यांना कर रचनेतील बदलामुळं आणखी एक दणका बसलाय. राज्यांत पेट्रोल, डिझेल आणि गॅसची दरवाढ झालीय. महाराष्ट्रासह सात राज्यांतील जनतेला ही दरवाढ सोसावी लागणार आहे.

Jul 25, 2012, 01:53 PM IST

उपकार झाले, गॅस, डिझेलचे भाव नाही वाढले

केंद्रीय पेट्रोलिअम मंत्री जयपाल रेड्डी यांनी नागरिकांना काहीसा दिलासा दिला आहे. तूर्तास डिझेल आणि गॅसची दरवाढ होणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. तसंच केरोसिनचे दरही वाढणार नसल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

May 28, 2012, 05:13 PM IST

अजितदादांची २ टक्के पिछेहाट!

बजेटमधील गॅस दरवाढ 2 टक्के मागे घेण्याची घोषणा अजित पवार यांनी विधान परिषदेत केलीय. 2012-13 चे बजेट सादर करताना अर्थमंत्री अजित पवारांनी घरगुती गॅसवर 5 टक्क्यांचा अतिरिक्त कर लावल्यानंतर जनतेत नाराजी पसरली होती.

Mar 29, 2012, 06:16 PM IST

गॅस कर : मागे घेण्यासाठी विरोधकांचा दबाव

गॅस दरवाढीविरोधात शिवसेना आमदारांनी विधानसभेत घोषणाबाजी केली. गॅस दरवाढ कमी करण्याची मागणी केली. गॅस सिलिंडरवर पाच टक्के कर लावल्यानं सरकारला २००कोटी रुपयांचा महसूल मिळणार आहे.

Mar 28, 2012, 03:44 PM IST

दादांचे गॅस दरवाढीचे पाऊल मागे

स्वयंपाकाच्या गॅसवर केलेली पाच टक्के दरवाढ मागे घेण्यासाठी दबाव वाढल्यानं अर्थमंत्री अजित पवार तसा निर्णय घेण्याची शक्यता दुणावली आहे. दरम्यान विरोधक आणि सत्ताधा-यांच्या विरोधामुळे गॅसदरवाढ मागे घेण्याचे संकेत अजित पवारांनी दिले आहेत. दरवाढीबाबत योग्य तो निर्णय घेऊ असे पवार यांनी 'झी २४ तास'शी बोलताना सांगिरले.

Mar 27, 2012, 04:51 PM IST

नाशिकमध्ये २१ सिलिंडर्सचा स्फोट

नाशिकमध्ये देवळाली कॅम्प परिसरात २१ सिलिंडरचा स्फोट झाला. त्यात एक जण जखमी झाला. दहा ते बारा सिलिंडरमधून गळती झाल्याची माहितीही समोर येत आहे. देवळालीतल्या लिंगायत कॉलनीमध्ये ही घटना घडली आहे.

Jan 17, 2012, 02:16 PM IST