gang rape

मुंबई गँग रेप : फॉरेन्सिक टीम मुंबईत,‘परागकण’ची मदत

मुंबईत महिला फोटोग्राफर बलात्कार प्रकरणी तपास करण्यासाठी दोन फॉरेन्सिक टीम मुंबईत दाखल झाली आहे. केंद्रीय फॉरेन्सिक आणि गुजरात फॉरेन्सिक टीमनं शक्ती मील कंपाऊंड परिसरात पाहणी केली.

Aug 27, 2013, 05:28 PM IST

मुंबई गँग रेप : ती पाच रेखाचित्र कोणी काढलीत?

पोलिसांना मुंबई सामूहिक बलात्कारातील पाचही आरोपींनी पकडण्यात यश आले. मात्र, यामागे कोणाचा हातभार लागला? या प्रश्नाचे उत्तर आहे, एक शिक्षक. रेखाचित्रकार नितीन यादव, सादिक शेख यांच्या मदतीने पाचही आरोपींच्या मुसक्या आवळता आल्यात. नितीन हे कला शिक्षक आहेत.

Aug 27, 2013, 12:12 PM IST

`ती`च्या लढ्यासाठी अॅड. उज्ज्वल निकमांची नियुक्ती

सामूहिक बलात्कार प्रकरणातल्या पाचही आरोपींना अटक करण्यात आलीय. त्यांच्याविरोधातला खटला फास्ट ट्रॅक कोर्टामार्फत चालवला जावा यासाठी प्रयत्न सुरू आहे. विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Aug 25, 2013, 08:43 PM IST

मुंबई गँगरेप : पाचव्या आरोपीला दिल्लीत अटक

मुंबईतल्या महिला फोटोग्राफवर गँगरेप प्रकरणी मुंबई पोलिसांना पाचही आरोपींना अटक करण्यात यश मिळालंय. या प्रकरणातील पाचवा आरोपी सलीम अन्सारी याला मुंबई क्राइम ब्रॅंचच्या पोलिसांना आज दिल्लीत अटक केली.

Aug 25, 2013, 12:49 PM IST

मुंबई गँगरेप : चौथ्या आरोपीला अटक

मुंबई गँगरेप प्रकरणातील चौथा आरोपीही पोलिसांच्या जाळ्यात अडकलाय. आज पहाटे चौथ्या आरोपीला अटक करण्यात आलीय. सिराज रेहमान असं या आरोपीचं नाव आहे. त्याला गोवंडी परिसरातून अटक करण्यात आलीय. तर या प्रकरणातल्या तिसऱ्या आरोपीला शनिवारी सायंकाळी महालक्ष्मी परिसरातून अटक करण्यात आली होती.

Aug 25, 2013, 09:02 AM IST

मुंबई गँगरेप : 'तो' अल्पवयीन, आजीचा दावा!

मुंबईमध्ये झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना अटक केलीय. या प्रकरणातला पहिला आरोपी चांद बाबू सत्तार शेख उर्फ मोहम्मद अब्दुल याच्या आजीनं चांद बाबू अल्पवयीन असल्याचा दावा केलाय.

Aug 24, 2013, 07:27 PM IST

उद्धवस्त करणारा सूर्यास्त

स्वप्नांचं शहर मुंबई.... रोज लाखो तरुण तरुणी डोळ्यांत मोठमोठी स्वप्नं घेऊन या शहरात येतात....मीही त्यांच्यापैकीच एक.... करीअर करीन तर मुंबईतच असा निर्धार करत मुंबई गाठली...

Aug 23, 2013, 10:36 PM IST

‘राज ठाकरेंना उत्तर देण्याची ही वेळ नाही’

मुंबईत महिला पत्रकारावर झालेल्या सामूहिक बलात्कारानंतर गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्यावर जोरदार टीका होतेय... राज ठाकरेंनी आबांना बांगड्या धाडण्याचंही आवाहन केलं... पण, ‘ही टीकेला उत्तर देण्याची वेळ नसून आपली कर्तव्य पार पाडण्याची वेळ आहे’ असं आबांनी राज ठाकरेंना सुनावलंय.

Aug 23, 2013, 09:32 PM IST

मुंबई बलात्कारावरून राजकारण सुरू

फोटो जर्नलिस्ट तरूणीवर झालेल्या सामूहिक बलात्काराच्या घटनेनंतर राजकीय नेत्यांनी एकमेकांवर चिखलफेक सुरू केलीय. गृहमंत्री म्हणून अपयशी ठरलेल्या आर. आर. पाटलांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी विरोधकांनी लावून धरलीय.

Aug 23, 2013, 09:21 PM IST

‘बांगड्या घालणारे मनगट कमजोर नव्हेत’

फुटकळ राजकारणाचा धिक्कार करत ‘बांगड्या घालणाऱ्या मनगटाला कमी लेखणाऱ्या’ राज ठाकरेंना काही महिलांनी जोरदार प्रत्यूत्तर दिलंय.

Aug 23, 2013, 08:52 PM IST

शालिनी ठाकरेंनी पाठविली आबांना बांगड्यांची भेट!

राज ठाकरेंच्या आवाहनाला लगेचच प्रतिसाद देत मनसेच्या कार्यकर्त्यांना आबांना खरोखरच बांगड्या धाडल्यात. या मनसे महिला सेनेचं नेतृत्व करत होत्या शालिनी ठाकरे...

Aug 23, 2013, 07:56 PM IST

मुंबई गँगरेप : `ती`ची प्रकृती स्थिर, धक्का मात्र कायम!

मुंबईत सामूहिक बलात्काराला बळी पडलेली पत्रकार तरुणीची प्रकृती सध्या स्थिर आहे परंतु तिला जोरदार मानसिक धक्का बसलाय.

Aug 23, 2013, 05:23 PM IST

आर. आर. आबांना बांगड्या पाठवा – राज ठाकरे

राज्यात कायदा आणि सुव्यवस्था ढासळली आहे. याला सर्वस्वी जबाबदार राज्याचे गृहमंत्री आर. आर. पाटील असून राज्यातील महिला भगिनींनी एका बॉक्समध्ये बांगड्या भरून त्यांना पाठवाव्यात.

Aug 23, 2013, 02:26 PM IST

मुंबई गँगरेप : एकाला अटक, चार फरार - पोलीस आयुक्त

मुंबईतील सामूहिक बलात्काराची घटना अतिशय निंदनीय आहे. याप्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. त्यांने आपला गुन्हा कबुल केला आहे. तर यातील चार जण फरार आहे, अशी माहिती पत्रकार परिषदेत मुंबईचे पोलीस आयुक्त सत्यपाल सिंह यांनी दिली.

Aug 23, 2013, 02:09 PM IST

मुंबई बलात्कार - काय म्हणाले राज ठाकरे

आर. आर. पाटील यांच्या घरी महाराष्ट्रातील महिलांनी बांगड्या पाठवा - राज ठाकरे

Aug 23, 2013, 01:36 PM IST