मुंबई गँग रेप : ती पाच रेखाचित्र कोणी काढलीत?

पोलिसांना मुंबई सामूहिक बलात्कारातील पाचही आरोपींनी पकडण्यात यश आले. मात्र, यामागे कोणाचा हातभार लागला? या प्रश्नाचे उत्तर आहे, एक शिक्षक. रेखाचित्रकार नितीन यादव, सादिक शेख यांच्या मदतीने पाचही आरोपींच्या मुसक्या आवळता आल्यात. नितीन हे कला शिक्षक आहेत.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Aug 27, 2013, 12:14 PM IST

www.24taas.com , झी मीडिया, मुंबई
पोलिसांना मुंबई सामूहिक बलात्कारातील पाचही आरोपींनी पकडण्यात यश आले. मात्र, यामागे कोणाचा हातभार लागला? या प्रश्नाचे उत्तर आहे, एक शिक्षक. रेखाचित्रकार नितीन यादव, सादिक शेख यांच्या मदतीने पाचही आरोपींच्या मुसक्या आवळता आल्यात. नितीन हे कला शिक्षक आहेत.
शक्ती मील सामूहिक बलात्काराच्या घटनेनंतर ७२ तासांच्या आत पाचही आरोपी गुन्हे शाखेने अटक केली. मुंबई व्हाया दिल्ली प्रवास करून सर्वांना जेरबंद केले. ज्यांनी स्केच तयार केले ते कला शिक्षक नितीन त्यांचा सहकारी आणि आग्रीपाडा पोलिसांचे पथक यांनीच पाचही जणांचा छडा लावला.
बलात्काराच्या घटनेची माहिती मिळतात, पोलीस तपासाची सूत्रे वेगाने हललीत. वरिष्ठांनी सूचना केल्यात. बलात्कारात पाच आरोपी सहभागी असल्याची माहिती मिळाली. कोणी खबऱ्यांना फोन केला. मात्र, माहिती हाती येत नव्हती. पोलिसांना मिळालेल्या माहितीवरून स्केच (रेखाचित्र) काढण्याचा निर्णय घेतला आणि पोलिसांनी नितीन यादव आणि सादिक शेख यांना तत्काळ ना. म. जोशी मार्ग पोलीस ठाण्यात बोलावून घेतले.
मध्यरात्रीचे ३ ते पहाटे ५ या अवघ्या दोन तासांत या दोन कलाकारांनी पाचही रेखाचित्रे तयार केली. त्यापैकी यादव यांनी तीन तर सादिक यांनी दोन स्केच काढलीत. पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास ही पाचही रेखाचित्रे आयुक्त सत्यपाल सिंग यांच्या आदेशानुसार तपासासाठी तयार केलेल्या २० विशेष पथकांसह मुंबईतल्या सर्वच पोलीस ठाण्यांत वॉटस्अप, ईमेल अशा मिळेल त्या माध्यमातून सेंट करण्यात आलीत.
सर्वच रेखाचित्रे ८५ ते ९० टक्के मिळतीजुळती ठरल्याने आरोपींनी ओळखणे सोपे झाले. याच स्केचच्या आधारे आरोपी हात लागण्यास केवळ ७२ तास लागलेत. रेखाचित्रे आग्रीपाडा पोलिसांच्या हाती लागताच त्यापैकी एकाला त्यांनी लगोलग ओळखले आणि अटकही केली.

समाजसेवेच्या भावनेतून मी गेली २५ वष्रे रेखाचित्रे काढतोय. या कालावधीत मी ठरावीक चेहेरेपट्टीचे एक पुस्तक तयार केले आहे. यात कवटीच्या भागापासून, भांग, मिशीच्या रचनेपर्यंत चेहेर्याकच्या प्रत्येक भागातली विविधता दर्शविणारी चित्रे आहेत, असे यादव सांगतात.
पिडीत तरुणीच्या सहकार्या्ने दिलेल्या माहितीनुसार ही स्केच काढलीत. तो छायाचित्रकार असल्याने त्याच्या माहितीने ते सहज शक्य झाले. त्याची मदत झाल्याने तात्काळ रेखाचित्र काढता आलीत. छायाचित्रकारांना सर्वसामान्यांपेक्षा वेगळी नजर लाभलेली असते, असे यादव सांगतात.
स्केचनंतर चांद शेखला आग्रीपाडा पोलिसांनी लगेचच ओळखले. त्याला ताब्यात घेण्यासाठी सापळा रचला. यात यश आले. आग्रीपाडा पोलिसांनी चांदला केलेली अटक गुन्हे शाखेच्या तपासात महत्त्वाची ठरली. चांदनेच दिलेल्या माहितीमुळे अन्य चार आरोपींची ओळख पटली, त्यांचा ठावठिकाणा हाती आला.
शक्ती मील सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपींना गजाआड करण्यास रेखाचित्राच्या माध्यामातून महत्त्वाचा दुवा ठरलेले नितीन यादव यांना या कामगिरीसाठी मुंबईपालिकेमार्फत सोमवारी `विशेष सामाजिक कार्य पुरस्कार` जाहीर करण्यात आला. त्यांना ५ सप्टेंबला गौरविण्यात येणार आहे.
चेंबूर येथील अनुदानित शाळेत चित्रकलेचे शिक्षक म्हणून ते कार्यरत आहेत. गेली २३ वर्षे त्यांनी अनेक गुन्हेगारांचे रेखाचित्र काढून पोलिसांच्या तपासाला वेग दिला आहे. अँन्टॉप हिल, धारावी, कुर्ला, गोवंडी, चेंबूर अशा पोलीस ठाण्यांमध्ये अर्धवेळ चित्रकार म्हणून गुन्हेगारांचे चित्र काढण्याचे काम ते करीत आहेत.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.