flood situation

मोदी पूरग्रस्त भागातील बचाव आणि पुनर्वनस कार्याचा घेणार आढावा

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज आसाम आणि ईशान्येकडच्या राज्यांमध्ये आलेल्या पुराचा आणि त्यानंतर सुरु असलेल्या बचाव आणि पुनर्वनस कार्याचा आढावा घेणार आहेत. त्यासाठी आज सकाळीच ते गुवाहाटीला रवाना झाले. 

Aug 1, 2017, 08:38 AM IST

पूरपरिस्थितीमुळे कोल्हापूर - रत्नागिरी वाहतूक बंद

जिल्ह्यात सर्वत्र मुसळधार पाऊस पडत असून जांभळी आणि कासारी नदीला देखील पूर आलाय. इतकंच नव्हे तर या पुराचं पाणी बाजारभोगाव इथल्या  बाजारपेठेत शिरले आहे. दरम्यान, कोल्हापूर - रत्नागिरी मार्ग पूर्णत: वहातुकीसाठी बंद ठेवण्यात आलाय. शिवाजी पुलावरील वहातूक प्रशासनान थांबवली आहे.

Jul 21, 2017, 10:32 PM IST

रत्नागिरी जिल्ह्याला पावसाने झोडपले, संगमेश्वर-चिपळुणात पूर परिस्थिती

सलग तिसऱ्या दिवशी मुसळधार पावसाने रत्नागिरी जिल्ह्याला झोडपले. मध्यरात्री थोडीशी उसंत घेतलेल्या पावसानं सकाळपासून पुन्हा धुवॉधार बॅटिंग सुरु केलीय. रत्नागिरी, संगमेश्वर, चिपळूण, खेड तालुक्यात पावसाची संततधार सुरु आहे. 

Jul 19, 2017, 09:41 PM IST

नाशिकमधली पूरस्थिती जैसे थेच

नाशिकमधली पूरस्थिती जैसे थेच आहे.  आजही मंदिरं आणि गोदाकाठचा परिसर पाण्याखाली आहे. आजही नाशिकमधल्या शाळा आणि कॉलेजेसना सुट्टी देण्यात आली. पुढचे दोन दिवस मुसळधार  राहील, असा अंदाज वर्तवण्यात आलाय. आतापर्यंत शेकडो कुटुंबाना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आलंय. 

Aug 3, 2016, 11:15 PM IST

५ दिवसांपासून राज्यात पावसाचा हाहाकार

गेल्या 4 ते 5 दिवसांपासून राज्यात सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे विविध ठिकाणी  नद्यांना महापूर आलेत. 

Aug 3, 2016, 08:12 PM IST

कोल्हापुरातील पूर परिस्थिती ओसरली

जिल्ह्यात पूर परिस्थिती ओसरु लागली आहे. पंचगंगा नदीची पाणी पातळी ४५ फुट ६ इंचावरुन ४३ फुटावर पोहचली आहे. 

Jul 15, 2016, 11:39 PM IST

सांगली जिल्ह्यातील भीषण पूरस्थिती

जिल्ह्यात सलग चार दिवस मुसळधार पाऊस झाला आहे. कृष्णा आणि वारणा नद्याचे पाणी पात्राबाहेर आले आहे. जिल्ह्यातील ६ गावांचा संपर्क तुटला आहे. काही गावकऱ्यांनी होड्या काढून सुरक्षित ठिकाण गाठण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.

Jul 12, 2016, 07:22 PM IST

विदर्भ-कोकणात पूर परिस्थिती

चंद्रपूर जिल्ह्यात पुराची परिस्थिती कायम आहे. मात्र या पुरपरिस्थितीला पाऊस कारणीभूत नाही. वर्धा , पैनगंगा आणि वैनगंगा या नद्यांना आलेला पूर आणि त्यांच्या दबावामुळे इरई नदीचं बॅक वॉटर शहरात घुसल्यामुळे पूरपरिस्थिती निर्माण झालीय.

Aug 2, 2013, 08:57 PM IST