राज्यात मुसळधार पावसामुळे या एक्सप्रेस रद्द

राज्यात ठिकठिकाणी मुसळधार पाऊस

Updated: Aug 8, 2019, 01:57 PM IST
राज्यात मुसळधार पावसामुळे या एक्सप्रेस रद्द  title=

मुंबई : राज्यात ठिकठिकाणी पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे रेल्वे प्रशासनानं ८ आणि १० ऑगस्ट रोजी धावणारी बिदर-लातूर-पुणे-मुंबई सीएसटी एक्सप्रेस रद्द केली आहे. तर ९ आणि १० ऑगस्ट रोजी धावणारी मुंबई सीएसटी-पुणे- लातूर-बिदर  एक्सप्रेसही रद्द करण्यात आली आहे. याशिवाय ९ आणि ११ रोजी धावणारी लातूर-पुणे- मुंबई सीएसटी एक्सप्रेस रद्द करण्यात आली. ८ आणि ११ ऑगस्ट रोजी धावणारी मुंबई सीएसटी-लातूर एक्सप्रेसही रद्द करण्यात आली आहे. 

याशिवाय मुंबई सीएसटी ते हैद्राबाद एक्सप्रेसही ९ ते १२ ऑगस्टपर्यंत रद्द करण्यात आल्या आहेत. तर हैद्राबादहून मुंबई सीएसटी पर्यंत धावणारी रेल्वे ८ ते ११ ऑगस्टपर्यंत रद्द करण्यात आली आहे.