dr babasaheb ambedkar

डॉ. आंबेडकरांचे कधी होणार स्मारक ?

आरपीआय आठवले गटाच्या कार्यकर्त्यांनी मुंबई आणि उपनगरांमध्ये आंदोलन सुरु केलंय...डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकासाठी इंदू मिलची जागा त्वरीत देण्यात यावी अशी आरपीआयची मागणी आहे....पण हे स्मारक कधी उभं राहणार असा प्रश्न आता आंबेडकरी जनतेकडून विचारला जात आहे.

Jun 12, 2012, 10:34 PM IST

अंबेडकर स्मारकावरून वाद सुरूच

इंदू मिल परिसरात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला विलंब लागत असल्याचा आरोप करत रिपब्लीकन सेनेनं आंदोलन केलं होतं. रिपब्लिकन स्मारकाचं प्रतिकात्मक भूमिपूजन करण्याचं जाहीर केल्यानं वाद निर्माण झाला होता.

Apr 14, 2012, 09:15 PM IST

राज्यात महामानवाला अभिवादन

१२१ व्या जयंती निमित्त आज राज्यात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय. राज्यासह देशातल्या कानाकोप-यातून दादरच्या चैत्यभूमिवर बौद्धबांधव बाबसाहेबांना मानवंदना करण्यासाठी आलेत. मुंबईतल्या चैत्यभूमीवर कालपासूनच बौद्ध अनुयायांची गर्दी होती. परिसराला यात्रेचं स्वरुप आलय. दुसरीक़डं नागपूरच्या दिक्षाभूमीवरही बाबासाहेबांना आदरांजली वाहण्यासाठी मोठी गर्दी झाली आहे.

Apr 14, 2012, 02:24 PM IST

आंबेडकर स्मारकासाठी RPIने रेल्वे रोखली

इंदू मिलच्या जागेवरुन आरपीआयच्या कार्यकर्त्यांनी बोरिवली रेल्वे स्टेशनमध्ये रेल रोको केला. चर्चगेटकडे जाणारी रेल्वे अडवली. त्यामुळ काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती.

Mar 17, 2012, 08:30 PM IST

‎'इंदू मिलमधून कार्यकर्त्यांना बाहेर काढा'

इंदू मिल कब्जा प्रकरणी हायकोर्टाने सरकारवर ताशेरे ओढलेत. इंदू मिलमधून कार्यकर्त्यांना बाहेर काढण्यासाठी सरकारला एका आठवड्याची मुदत देण्यात आली आहे.

Dec 22, 2011, 08:01 AM IST

उद्या इंदू मिलमध्ये 'रिपाइं'चं आंदोलन

झी २४ तास वेब टीम, मुंबई

 

दादरमधल्या इंदू मिलच्या जागेवर डॉक्टर आंबेडकरांचं स्मृती स्मारक उभारण्यासाठी जागा द्यावी यासाठी ६ डिसेंबरला रिपब्लिकन सेना आंदोलन करणार आहे. इंदू मिलच्या जागेवर हे आंदोलन केलं जाईल.

 

Dec 5, 2011, 03:24 AM IST