deepak sawant

डॉ. दीपक सावंतांचं पद काढून घेण्याची शिवसैनिकांची मागणी

आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांच्याकडे असणारे उस्मानाबाद जिल्ह्याचे पालकमंत्रीपद काढून घेण्याची मागणी खुद्द जिल्ह्यातील शिवसैनिकांनीच केल्याने खळबळ माजली आहे. डॉ. दीपक सावंत यांच्याकडे पालकमंत्रीपद दिल्यानंतर प्रशासन गतिमान होईल अशी अपेक्षा शिवसैनिकांना होती; मात्र त्यांच्या दुर्लक्षामुळे जिल्ह्यात अधिकारीराज सुरू असल्याचे आरोप करीत त्यांना तातडीने हटवून शिवसेनेचाच दुसरा पालकमंत्री नियुक्त करण्याची मागणी थेट शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे शिवसैनिकांनी निवेदनाद्वारे केली आहे.

Aug 20, 2016, 10:38 AM IST

रत्नागिरी जिल्हा रूग्णालयात वैद्यकीय महाविद्यालय : आरोग्यमंत्री

जिल्हा रूग्णालयात लवकरच वैद्यकीय महाविद्यालय सुरू करणार असल्याची घोषणा राज्याचे आरोग्यमंत्री दीपक सावंत यांनी येथे केली.

Aug 10, 2016, 08:28 PM IST

आरोग्य खात्यात ८५०० पदे भरणार, २५ ऑक्टोबरला परीक्षा

आरोग्य विभागातील गट क आणि ड वर्गातील  ८५०० पदे येत्या डिसेंबर महिन्यांपर्यंत भरली जाणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी दिली. 

Aug 8, 2015, 07:57 AM IST

झी मीडिया इम्पॅक्ट : जव्हारमध्ये मेळघाट पॅटर्न राबवणार

जव्हारमध्ये मेळघाट पॅटर्न राबवणार

Aug 4, 2015, 10:42 AM IST

खबरदार! तंबाखू खाऊन थुंकल्यास करावं लागणार काम

तंबाखू मळून तंबाखूची बुक्की तोंडात कोंबून चघळणाऱ्यांना चाप बसणार आहे. खबरदार! सार्वजनिक ठिकाणी तंबाखू चघळणे तुम्हाला भारी पडू शकते. सार्वजनिक ठिकाणी तंबाखू चघळण्यास बंदी घालण्यात आली आहे. तशी घोषणाच सार्वजनिक आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी विधानसभेत केली.

Apr 10, 2015, 09:56 AM IST

स्वाईन फ्लूचा धोका वाढला, आरोग्यमंत्री राजीनामा द्या - विखे पाटलांची मागणी

अवकाळी पावसामुळं स्वाईन फ्लूचा धोका वाढल्यामुळं राज्यातल्या डॉक्टरांच्या सुट्या रद्द करण्यात आल्यात. आरोग्यमंत्री दीपक सावंत यांनी याबाबत आदेश दिलेत. 

Mar 1, 2015, 10:20 PM IST