मुंबई विमानतळावर सुरक्षेत मोठी त्रुटी, एकाच धावपट्टीवर दोन विमानं...थरारक Video समोर

Mumabi Airport : मुंबई विमानतळावरच्या सुरक्षेत मोठी त्रुटी झाल्याचं समोर आलं आहे. एकाच धावपट्टीवर दोन विमानं आल्याने मोठी दुर्घटना होण्याची भीती होती. सुदैवाने थोडक्यात ही घटना टळली. याचा व्हिडिओ आता व्हायरल झाला आहे. 

कपिल राऊत | Updated: Jun 10, 2024, 06:33 PM IST
मुंबई विमानतळावर सुरक्षेत मोठी त्रुटी, एकाच धावपट्टीवर दोन विमानं...थरारक Video समोर title=

Mumabi Airport : मुंबई विमानतळावर सुरक्षेत मोठी त्रुटी झाली असून एकाच धावपट्टीवर दोन विमानं आल्याने मोठी दुर्घटना झाली असती. सुदैवाने हा अपघात (Accident) टळला असून या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर वायरल (Viral Video) होत आहे. एअर इंडियाचं  (Air India) विमान धावपट्टीवर असतानाच इंडिगो (Indigo) विमानाला उतरण्याची परवानगी दिल्याचा धक्कादायक प्रकार मुंबई विमानतळावर घडला. एअर इंडियाच विमान हवेत झेपावत असतानाच इंडिगो विमानाचं लँडिंग होत होतं दोन्ही विमानं एकमेकांच्या जवळ आल्याने मोठी दुर्घटना होण्याची भीती होती.

रन वे 27 वर घडलेल्या प्रकाराची DGCA ने चौकशी सुरू केली आहे असून या प्रकरणाशी संबंधित असलेल्या हवाई वाहतूक नियंत्रण कक्षातील संबंधित कर्मचाऱ्यांना काम करण्यापासून रोखण्यात आलेलं आहे. एका चुकीमुळे शेकडो प्रवाशांचा जीव धोक्यात होता.

काय घडलं नेमकं?
शनिवारी सकाळी मुंबई विमानतळावर ही घटना घडली. या घटनेचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एअर इंडियाचं विमा 657 मुंबईहून तिरुवनंतपुरमसाठी उड्डाण घेत होतं. पण त्याचवेळी इंडिगोचं 5053 हे विमान धावपट्टीवर उतरलं. इंडिगोच्या विमानाचं लँडिंग आणि एअर इंडियाच्या विमानाचं टेक ऑफ एकाचवेळी झालं. टेकऑफसाठी थोडासा जरी उशीर झाला असता तर भीषण अपघात घडू शकला असता. 

मुंबई विमानतळ जगातील सर्वात व्यस्त विमानतळांपैकी एक आहे. मुंबई विमानतळावरुन दर तासाला सुमारं46 विमानांचं उड्डाण होतं. तर दिवसाला हा आकडा हजाराहून अधिक जातो. विमा आणि प्रवाशांची सुरक्षा करण्याची जबबादारी हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाकजे असते. कोणत्या वेळेला कोणतं विमान लँडिंग होणार आणि कोणतं विमान उड्डाण घेणार याचा वेळ ठरलेला असतो. घटनेच्या दिवशी दृश्यमानताही चांगली होती. त्यामुळे चूक नेमकी कोणाची याची आता चौकशी सुरु करण्यात आली आहे.