cm devendra fadnavis

मध्यावधी निवडणुकीसाठी तयार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

प्रदेश भाजप मध्यावधी निवडणूकीसाठी तयार असल्याचं विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. शिवाय निवडणुका झाल्या तर पुन्हा एकदा सत्ता मिळवण्याचा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे. शेतक-यांच्या आंदोलनाच्यावेळी काही पक्षांनी सरकारचा पाठिंबा काढून घेण्याची भाषा केली. त्यांना उत्तर देताना आम्ही मध्यावधीला तयार असल्याचं आम्ही सांगितलं होतं, असा टोला मुख्यमंत्र्यांनी हाणला आहे.

Jun 15, 2017, 08:34 AM IST

संपामुळे शेतकऱ्यांचेच नुकसान, हिंसा घडविण्यात दोन्ही काँग्रेसचा डाव : मुख्यमंत्री

शेतकऱ्यांच्या संपाच्या मुद्यावर अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मौन सोडले आहे. संपाच्या आडून काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा हिंसेचा डाव असल्याचा सणसणीत आरोप मुख्यमंत्र्यांनी केलाय. 

Jun 1, 2017, 05:49 PM IST

मोदींच्या भेटीनंतर सीएम गप्पच, भाजपमध्ये प्रचंड असवस्थता

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. मात्र, मुख्यमंत्री माघारी आले तरी ते काहीही बोलले नाहीत. त्यामुळे नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड असवस्थता आहे.

Mar 1, 2017, 08:12 PM IST

5 कोटी सैनिकांना देण्याच्या प्रस्तावाला आपला विरोध : मुख्यमंत्री

'ऐ दिल है मुश्किल' चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या मोबदल्यात 5 कोटींची मदत सैनिक कल्याण निधीला देण्याच्या प्रस्तावाला आपला विरोध असल्याचं स्पष्टीकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे.

Oct 25, 2016, 02:19 PM IST

युती-आघाडीच्या भानगडीत पडू नका : मुख्यमंत्री

युती-आघाडीच्या भानगडीत पडू नका, अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी भाजप कार्यकर्त्यांना दिल्या आहेत. ते येथील प्रमुख पदाधिकारी मेळाव्यात बोलत होते. 

Oct 20, 2016, 11:45 PM IST

राज्यात सुख, शांती आणि समृद्धीसाठी मुख्यमंत्र्यांचं गणरायाला साकडं

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा या शासकीय निवसस्थानी गणरायाचं आगमन मोठ्या उत्साहात आगमन झालं. 

Sep 5, 2016, 02:20 PM IST

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या दुष्काळी दौऱ्यात घोषणांचा पाऊस

सलग तीन दिवस दुष्काळी मराठवाड्याचा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दौरा केला या दौ-यात त्यांनी अनेक घोषणा केल्या.. मराठवाड्याला दिलासा देण्यासाठी प्रसंगी सरकार कर्ज काढून मदत करेल, अशी ग्वाही त्यांनी दिलीय.  मात्र जोपर्यंत घोषीत योजनांनी अंमलबजावणी होत नाही तो पर्यंत मराठवाड्याला काही मिळाले, असे म्हणता येणार नाही अशी चर्चा आहे.

Sep 4, 2015, 07:13 PM IST

मुख्यमंत्र्यांनी केली पंकजा मुंडेंची पाठराखण

मुख्यमंत्र्यांनी पंकजा मुंडेची पाठराखण करत चौकशीतून काहीही निष्पन्न न झाल्याचं स्पष्ट केलं. तसंच खोदा पहाड निकला चुहा.. अशा शेलक्या शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चिक्की प्रकरणी विरोधकांच्या आरोपांचा समाचार घेतला...

Jul 30, 2015, 08:30 PM IST

'एक असतो बसलेला आणि एक असतो बसवलेला मुख्यमंत्री'

'एक असतो बसलेला आणि एक असतो बसवलेला मुख्यमंत्री'

Jun 26, 2015, 12:36 PM IST