मध्यावधी निवडणुकीसाठी तयार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

प्रदेश भाजप मध्यावधी निवडणूकीसाठी तयार असल्याचं विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. शिवाय निवडणुका झाल्या तर पुन्हा एकदा सत्ता मिळवण्याचा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे. शेतक-यांच्या आंदोलनाच्यावेळी काही पक्षांनी सरकारचा पाठिंबा काढून घेण्याची भाषा केली. त्यांना उत्तर देताना आम्ही मध्यावधीला तयार असल्याचं आम्ही सांगितलं होतं, असा टोला मुख्यमंत्र्यांनी हाणला आहे.

Updated: Jun 15, 2017, 04:39 PM IST
मध्यावधी निवडणुकीसाठी तयार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस title=

मुंबई : प्रदेश भाजप मध्यावधी निवडणूकीसाठी तयार असल्याचं विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. शिवाय निवडणुका झाल्या तर पुन्हा एकदा सत्ता मिळवण्याचा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे. शेतक-यांच्या आंदोलनाच्यावेळी काही पक्षांनी सरकारचा पाठिंबा काढून घेण्याची भाषा केली. त्यांना उत्तर देताना आम्ही मध्यावधीला तयार असल्याचं आम्ही सांगितलं होतं, असा टोला मुख्यमंत्र्यांनी हाणला आहे.

अर्थात शिवसेनेच्या सत्तेत राहून विरोधाच्या भूमिकेकडेच फडणवीसांचा रोख होता हे वेगळं सांगण्याची गरज नाही. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीत मिळालेल्या विजयानंतर भाजपमध्ये, या हेतूनं मध्यावधी निवडणूकीच्या चर्चा रंगल्या होत्या. पण तेव्हा प्रदेश नेतृत्वानं मध्यावधी निवडणूकीची शक्यता नाकारली होती. पण गेल्याच आठवड्यात कर्जमाफीची घोषणा केली. आता या पार्श्वभूमीवर आलेल्या मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यानं पुन्हा एकदा निवडणुकांच्या चर्चेला जोर आला आहे.