chhagan bhujbal

भुजबळांचा इशारा- अतिक्रमणं हटवणारच!

येवल्यातील अतिक्रमणे हटवावीच लागणार असा इशारा सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांनी अतिक्रमण धारकांना दिलाय. त्यामुळे अतिक्रमण करणा-यांचे धाबे चांगलेच दणाणले आहेत.

Dec 16, 2012, 07:54 PM IST

भुजबळांनीच केलाय ओबीसींवर अन्याय- शेलार

सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांनी दोन दिवसांपूर्वी ओबीसी समाजावर अन्याय होत असल्याची टीका केली होती. भुजबळांच्या या वक्तव्याचा त्यांचे एकेकाळाचे खंदे समर्थक राष्ट्रवादीचे माजी शहराध्यक्ष गजानन शेलारांनी चांगलाच समाचार घेतलाय.

Nov 7, 2012, 10:44 PM IST

मी `ओबीसी` असल्यामुळे...- छगन भुजबळ

मी ओबीसी असल्यामुळे हेतूपुरस्सर मला टार्गेट करण्यात येत असल्याची टीका सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळांनी केली. गेल्या ६ महिन्यांपासून त्यांच्यावर सातत्यानं आरोप होत असल्यामुळे त्यांनी आपली बाजू मांडण्यासाठी हे विधान केलं.

Nov 4, 2012, 10:32 PM IST

सोमय्यांचा भुजबळांवर नवा आरोप

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी छगन भुजबळ यांच्यावर आणखी एक बॉम्बगोळा टाकलाय. पुण्यातील हेक्सवर्ल्ड प्रकल्पात भुजबळांनी घोटाळा केल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केलाय. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना या प्रकल्पात 40 फ्लॅट दिल्याचंही सोमय्या यांनी सांगितलय.

Oct 10, 2012, 05:01 PM IST

शिवसेना आणि भुजबळांचं एकमत

बेळगाव विधानसभेच्या उद्घाटनाला राष्ट्रपती प्रणव मुखर्जींनी जाऊ नये, यावर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांचं एकमत झालं आहे. बेळगाव विधानसभेच्या उद्घाटनाला जाऊ नये असं पत्र सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांनी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना पाठवलंय.

Oct 8, 2012, 05:27 PM IST

भुजबळांच्या चौकशीला अखेर गृहखात्याची परवानगी

नवी दिल्लीतल्या महाराष्ट्र सदनच्या उभारणीत झालेल्या कथित गैरव्यवहारप्रकरणी छगन भुजबळांच्य़ा एसीबीमार्फत चौकशीला गृह खात्यानं मंजूरी दिली आहे. दिल्लीतल्या महाराष्ट्र सदनाच्या उभारणीची कंत्राटं देताना सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांनी आपल्या मर्जीतील लोकांना आणि सुनांच्या कंपन्यांना कंत्राटे मिळतील अशी व्यवस्था केल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केलाय.

Sep 18, 2012, 02:40 PM IST

छगन भुजबळ महाघोटाळेबाज - सोमय्या

महाघोटाळे करुनही मंत्रीपदावर कायम राहणा-या सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांच्या राजीनाम्याची मागणी राज्यपालांकडं करणार असल्याची माहिती भाजप नेते किरीट सोमय्या यांनी दिलीय.

Jul 22, 2012, 01:22 PM IST

मनसेचा टोल हल्ला, भुजबळांवर गुन्हा

पुण्यातल्या शिरूरजवळच्या टोलनाक्यावरील टोल वसुलीविरोधात कोर्टात दाखल झालेल्या प्रकरणी कोर्टाच्या आदेशावरून सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांच्यासह २२ जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आलेत. राज ठाकरे यांच्या इशाऱ्यांनतर राज्यभर मनसेच्या रडारावर टोल नाके आलेत. ठिकठिकाणी टोल नाक्यांची तोडफोड करण्यात आली आहे.

Jun 13, 2012, 05:48 PM IST

शिवसेना-भुजबळ सामन्यात मनसेची भूमिका काय?

नाशिकच्या स्थानिक स्वराज संस्थेच्या एका जागेसाठी निवडणूक होतेय. यावेळी नाशिकमध्ये भाजप शिवसेना आणि मनसे अशी युती होण्याची शक्यता आहे. तर राष्ट्रवादीला काँग्रेस साथ देणार आहे. असं असलं तरी सामना शिवसेना विरुद्ध छगन भुजबळ असाच होणार असल्याच सांगण्यात येतंय.

May 24, 2012, 08:40 AM IST

"मीच का दोषी?"- भुजबळ

शिक्षण संस्थांना कमी किंमतीत भूखंड देण्याबाबत कॅगच्या अहवालात ताशेरे ओढण्यात आल्याने राज्यात अनेक मंत्री अडचणीत आले आहेत. याबाबतीत सर्वांना समान न्याय असताना मलाच का दोषी ठरवण्यात येतंय, असा प्रश्न छगन भुजबळांनी उपस्थित केलाय.

Apr 12, 2012, 11:26 AM IST

भुजबळांच्या एमईटीची चौकशी सुरु

भुजबळांच्या मुंबई एज्युकेशन ट्रस्ट म्हणजेच एमईटीची आज चौकशी सुरु झाली. धर्मादाय आयुक्तांच्या आदेशानुसार आज सहाय्यक धर्मादाय आयुक्त मंगेश देशपांडे एमईटीची पाहणी केली. या चौकशीचं व्हिडिओ शुटींगही करण्यात आले आहे.

Apr 7, 2012, 06:28 PM IST

मनसेला आडकाठी, आठवले-भुजबळांच्या भेटीगाठी

नाशिक महापालिकेच्या सत्तासमीकरणांत नवे रंग भरलेत. भुजबळांनी आठवलेंना महापौरपदाची ऑफर दिली. शिवसेना-भाजप युतीचा पाठिंबा मिळाला तर तीन पक्षांच्या पाठिंब्यानं नाशिकमध्ये आठवलेंचा महापौर होऊ शकतो.

Feb 22, 2012, 10:06 PM IST

नाशिकमध्ये आघाडीचा 'ब्लेमगेम'

नाशिकचा गड राखण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं आघाडी केली. इतकं करुनही आघाडीची गाडी फक्त ३५ जागांपर्यंतच पोहोचू शकली. त्यामुळेच आता पराभवाचं खापर एकमेकांवर फोडत ब्लेमगेमला सुरुवात झाली आहे.

Feb 22, 2012, 08:29 PM IST

पवारांना कोंबडी, तंगड्यांशिवाय काही दिसत नाही - उद्धव

शरद पवारांना आजकाल कोंबडी आणि तंगड्यांशिवाय काही दिसत नाही असा सवाल करत उद्धव ठाकरेंनी नाशिकमध्ये आपल्या प्रचाराचा धडाका सुरू केला. सोनेरी कोंबडी कलानगरच्या खुराड्यातून बाहेर काढा याला प्रत्युत्तर देताना उद्धव यांनी शरद पवारांचा चांगलाच समाचार घेतला.

Feb 11, 2012, 11:56 AM IST

भुजबळांकडून आचारसंहिताभंग !

[jwplayer mediaid="35242"]

Jan 24, 2012, 11:32 PM IST