asian games

सानिया मिर्झा- साकेत मायनेनी जोडीला गोल्ड मेडल!

भारताच्या सानिया मिर्झा आणि साकेत मायनेनी जोडीनं आशियाई क्रीडा स्पर्धेतील टेनिसच्या मिश्र दुहेरीत गोल्ड मेडल जिंकलंय. त्यांच्या या सुवर्णयशानं भारताची टेनिस प्रकारातील मोहीम यशस्वी ठरली. इंचिऑन आशियाईमध्ये भारतानं टेनिसमध्ये एक सुवर्ण, एक रौप्य आणि तीन ब्राँझपदकांची कमाई केली. 

Sep 29, 2014, 09:46 PM IST

एशियन गेम्स : भारताला दुसरे सुवर्ण पदक, तिरंदाजीत यश

 एशियन गेम्स स्पर्धेत भारतीय तिरंदाजी संघाने ऐतिहासिक कामगिरी करत पुरुष सांघिक कंपाउंड प्रकारात सुवर्णपदक पटकाविले आहे. भारतीय संघाने यजमान दक्षिण कोरिया संघाचा 227-224 असा पराभव केला.

Sep 27, 2014, 02:39 PM IST

एशियन गेम्स : अभिनव बिंद्राला एअर रायफलमध्ये कांस्य पदक

एशियन गेम्समध्ये भारताने चांगली कामगिरी केलेय. भारताच्या अभिनव बिंद्राने कांस्य पदक पटकावले. एशियन गेम्स स्पर्धा आपल्यासाठी शेवटीच असेल, असे ट्विट अभिनव बिंद्रा यांने केले. त्यामुळे त्याने जवळपास निवृत्ती स्वीकारल्याचे दिसत आहे.

Sep 23, 2014, 10:09 AM IST

एशियन गेम्स : भारताच्या खात्यात पाचवे पदक

 एशियन गेम्स क्रीडा स्पर्धेच्या तिसऱ्या  दिवशी  भारताच्या खात्यात आणखी एक पदक जमा झाले. भारताने पाचवे पदक पटकाविले आहे. 

Sep 22, 2014, 01:05 PM IST

अपडेट : एशियन गेम्स : भारताकडे एक गोल्ड, एक ब्राँझ

दक्षिण कोरियाच्या इंचियोन इथं सुरु असलेल्या एशियन गेम्स २०१४ मध्ये शूटर्सनं भारतीय मेडल्सचं खात उघडलंय. पहिल्याच दिवशी भारताने एक गोल्ड आणि एक ब्राँझ मेडलची कमाई केली.

Sep 20, 2014, 11:23 AM IST

सुवर्ण विजेती महिला खेळाडू निघाली 'बलात्कारी पुरूष'!

अशियाई खेळांमध्ये २००६ साली सुवर्ण पदक जिंकलेली पिंकी प्रामाणिक भलतीच अप्रामाणिक असल्याचं समोर आलं आहे. पिंकी वास्तवात एक पुरूष असून तिने आपल्यावर बलात्कार केल्याचा आरोप एका विधवा महिलेने केला आहे.

Jun 15, 2012, 12:02 AM IST