एशियन गेम्स : भारताच्या खात्यात पाचवे पदक

 एशियन गेम्स क्रीडा स्पर्धेच्या तिसऱ्या  दिवशी  भारताच्या खात्यात आणखी एक पदक जमा झाले. भारताने पाचवे पदक पटकाविले आहे. 

IANS | Updated: Sep 22, 2014, 01:06 PM IST
एशियन गेम्स : भारताच्या खात्यात पाचवे पदक  title=

इंचियोन :  एशियन गेम्स क्रीडा स्पर्धेच्या तिसऱ्या  दिवशी  भारताच्या खात्यात आणखी एक पदक जमा झाले. भारताने पाचवे पदक पटकाविले आहे.

सांघिक स्पर्धेत भारताच्या हीना सिद्धू, राही सरनोबत आणि अनिसा सय्यद यांनी नेमबाजीत २५ मीटर पिस्तूलच्या प्रकारात कांस्य पदक मिळवले. 

जितू राय, प्रकाश नानजप्पा आणि समरेश जंग या त्रिकुटाने १० मीटर एअर पिस्तूल प्रकारात कांस्यपदकावर नाव कोरले. बॅडमिंटनमध्ये महिलांना उपांत्य लढतीत पराभवाचा सामना करावा लागला.

स्क्वॉशमध्ये दीपिका पल्लीकल आणि सौरव घोषाल यांनी पदके निश्चित केली आहेत. 

हॉकीमध्ये भारतीय पुरुषांनी श्रीलंकेचा ८-० असा एकतर्फी पराभव केला तर पुरुषांनी टेनिसमध्ये नेपाळला ३-० असे चितपट केले.

या स्पर्धेत भारताने आतापर्यंत एक सुवर्ण आणि चार ब्रॉंझ अशी कामगिरी केली आहे. चीनने आतापर्यंत एकूण ३४ पदके (१३ सुवर्ण, ९ रौप्य, १२ ब्रॉंझ) पटकावित पदकतालीकत अव्वल स्थान कायम राखले आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.