`हातासहीत, हातावरचं घड्याळही काढावं लागेल`
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नाशिकचे उमेदवार प्रदीप पवार यांच्या प्रचारासाठी राज ठाकरेंनी आज एकाच दिवशी नाशिकमध्ये दोन सभा घेतल्या. दोन्हीही सभेत राज ठाकरेंनी नरेंद्र मोदी आणि गुजरातच्या विकासावर स्तुतीसुमनं उधळली.
Apr 5, 2014, 09:48 PM ISTसामनातून उद्धव ठाकरेंनी फुंकलं निवडणुकीचं रणशिंग!
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी सामनातून मुलाखत दिलीय. यात त्यांनी लोकसभा निवडणुकांचं महत्त्व स्पष्ट केलंय.‘‘ही लढाई केवळ स्वार्थासाठी नाही, तर देशासाठी आहे. महाराष्ट्रातील महायुतीच्या सर्वच्या सर्व जागा जिंकू,’’ असा निर्धार त्यांनी केलाय! शिवसेनेतून जे निवडणुकीच्या तोंडावर गेले ते एकटेच गेले. ते नुसतेच नाममात्र होते
Mar 30, 2014, 09:14 AM ISTआडवाणींसाठी... सेनेचे भाजपला उपदेशाचे डोस!
अडवाणींच्या उमेदवारीवरुन शिवसेनेनं भाजपला खडे बोल सुनावलेत. गोष्ट छोटी, दुर्घटना मोठी या सामन्यातल्या अग्रलेखातून सेनेनं भाजपला कानपिचक्या दिल्यात.
Mar 22, 2014, 11:16 AM ISTमहायुतीत बिब्बा घालणाऱ्यांचा भाजपनं बंदोबस्त करावा- उद्धव
`महायुती अभेद्य असून भाजप अन्य कोणत्याही मार्गानं जाणार नसल्याचं नरेंद्र मोदी आणि राजनाथ सिंह यांनी शिवसेनेला आश्वस्त केलंय. त्यामुळं इतरांनी त्यावर बोलण्याची गरज नाही,` असं सांगत, `महायुतीत बिब्बा घालणाऱ्यांचा बंदोबस्त भाजपनं करावा,` असं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा ठणकावलंय.
Mar 13, 2014, 03:36 PM ISTकमळाबाईंसाठी सेनेचं `टेंगूळ आख्यान`, गडकरींवर टीकास्त्र
सामनाच्या अग्रलेखातून शिवसेनेनं भाजपवर टीका केलीय. `टेंगूळ आख्यान` या मथळ्याखाली आलेल्या अग्रलेखात भाजप-मनसे जवळीकीवर टीकास्त्र सोडलंय. दुश्मनांचे डोके फोडण्याऐवजी भाजप सध्या स्वतःच्या डोक्यात काठी मारुन टेंगूळ आणत असल्याची टीका यात करण्यात आलीय.
Mar 13, 2014, 11:43 AM ISTसामनातील टीकेला गडकरींचं उत्तर
राज ठाकरे यांची भेट घेतल्याप्रकरणी शिवसेनेनं सामना मुखपत्रात केलेल्या टीकेला भाजपचे माजी अध्यक्ष नितीन गडकरी यांनी उत्तर दिलंय.
Mar 6, 2014, 04:39 PM IST‘सामना’मधून गडकरींवर जबरी टीका
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि नितीन गडकरी यांच्या भेटीवरून शिवसेनेनं आपलं मुखपत्र सामनामधून नितीन गडकरींवर टीका केलीय...
Mar 5, 2014, 05:18 PM ISTराज ठाकरेंवर `सामना`तून जहाल टीका
महाराष्ट्र नव निर्माण सेनेच्या १२ तारखेच्या आंदोलनाचे स्क्रिप्ट काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सलीम-जावेद यांनी लिहलंय, अशी टीका शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या `सामना`मध्ये आज प्रसिद्ध झालेल्या अग्रलेखातून करण्यात आली आहे. मुझे अटक करो एकच नाटक नाव बदलून वारंवार रंगमंचावर येत असून त्यालास लोकाश्रय नसला तरी राजाश्रय लाभला आहे, अशी टीका या अग्रलेखात करण्यात आलीय. पाहूया या अग्रलेखात नेमकं काय म्हंटलं आहे.
Feb 11, 2014, 09:09 AM ISTशरद पवारांची सोबत अ...ह... `असंगाशी संग नको`!
शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसला महायुतीमध्ये स्थान नसल्याचं शिवसेनेनं स्पष्ट केलंय. `असंगाशी संग नको` या मथळ्याखाली प्रसिद्ध झालेल्या सामनाच्या अग्रलेखातून शिवसेनेनं आपली भूमिका मांडलीय.
Feb 1, 2014, 12:21 PM IST‘सामना’च्या शीर्षकाची कथा
बाळासाहेब ठाकरेंची जयंती आणि शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाचा वर्धापन दिन एकाच दिवशी.... पण तुम्हांला माहिती आहे का सामना या वर्तमानपत्राला नाव कसं मिळालं..... या शीर्षका मागील ऐका कथा.....
Jan 22, 2014, 09:51 PM IST‘ठाकरे उत्सव’ - शिवसेनाप्रमुखांचे विविध पैलू उलगडले!
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा पहिला स्मृतीदिन नुकताच झाला. जुने शिवसैनिक शिवसेनाप्रमुखांच्या अनेक आठवणी आणि किस्से जाणतात. त्यातलाच एक कार्यक्रम म्हणजे ठाकरे उत्सव...
Nov 20, 2013, 12:03 PM ISTसामनामध्ये युवराजांचं कौतुक, मोदींना टोला!
राहुल गांधींनी इंदूरच्या सभेत मुजफ्फरनगर संदर्भात काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींनी केलेलं वक्तव्य योग्यच आहे, असा चिमटा शिवसेनेचं मुखपत्र सामनामधून पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी घेतलाय. त्याबरोबरच या विधानाला विरोध करणाऱ्या नरेंद्र मोदी आणि अन्य भाजप नेत्यांनाही टोलेबाजी करण्यात आलीये.
Oct 28, 2013, 12:58 PM ISTशिवसेनेने घेतला नरेंद्र मोदींचा समाचार
शिवसेनेचे मुखमत्र असलेल्या `सामना`च्या अग्रलेखातून गुजरातचे मुख्यमंत्री आणि भाजपचे लोकसभा निवडणूक प्रचार समितीचे प्रमुख नरेंद्र मोदींना कानपिचक्या देण्यात आल्या आहेत. ज्यांना पंतप्रधानपदाची स्वप्न पडतात, त्यांना ते पद नेहमीच हुलकावणी देतं असा स्पष्ट इशारा या अग्रलेखातून देण्यात आला आहे.
Sep 7, 2013, 02:07 PM ISTतुम्हीच स्वत:ला उंचीवर नेऊ शकता!
एखाद्या शास्त्रीय नर्तिकेचा अपघातात एक पाय निकामी होऊनही तिची नृत्याची जिद्द कमी होत नाही. ती नकली पाय बसवून व्यासपीठावर नाचते.
Aug 1, 2013, 08:38 AM ISTयुतीत काहीही मिसळून बेचव करणार नाही – उद्धव ठाकरे
‘युती’ म्हणजे गिरगावच्या चौपाटीवरील भेळीचे दुकान नव्हे. त्यात काहीही मिसळावे आणि चव बिघडवावी!, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामना या वृत्तपत्रातील अग्रलेखात महायुतीत राज ठाकरे यांच्या प्रवेशाला विरोध केला आहे.
Mar 14, 2013, 08:49 PM IST