श्रीनगरमध्ये अतिरेक्यांच्या ग्रेनेड हल्ल्यात ८ जखमी
जम्मूतील अरनिया सेक्टरमध्ये हल्ल्याला दोन दिवस झाले नाही तो शनिवारी दुपारीश्रीनगरच्या ऐतिहासिक लाल चौकात संशयीत अतिरेक्यांनी ग्रेनेड हला केला.या हल्ल्यात ८ लोक जखमी झालेत.
Nov 29, 2014, 05:56 PM ISTकाश्मीर, झारखंडमध्ये मतदानाला सुरुवात
जम्मू काश्मीर आणि झारखंड राज्याच्या विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी आज मंगळवारी सकाळपासून मतदानाला सुरुवात झाली. काश्मीरमधील १५ आणि झारखंडमधील १३ मतदारसंघात हे मतदान होत आहे.
Nov 25, 2014, 11:49 AM ISTकाश्मीर पुरातील दीड लाख नागरिकांना वाचविण्यास यश
काश्मीर आणि जम्मूमध्ये मुसळधार कोसळलेल्या पावसाने पूर परिस्थितीने हाहाकार उडवला. पुरात अडकलेल्या अनेकांना बाहेर काढण्यात लष्कराने यश मिळविले. पुरात अडकलेल्यापैंकी 1.42 लाख नागरिकांचे जीव वाचविण्यात यश आले.
Sep 13, 2014, 09:26 PM ISTश्रीनगरमध्ये लष्कर, एनडीआरएफवर राग काढण्याचा प्रयत्न
जम्मू काश्मीरमध्ये सेनेने आणि एनडीआरएफच्या एका टीमने स्वत:चा जीव धोक्यात टाकून लोकांना वाचवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. पण एवढं करूनही काही लोकांनी एनडीआरएफवर राग काढण्याचा प्रयत्न केला आहे. पीटीआयने दिलेल्या बातमीनुसार श्रीनगरमधील एनडीआरएफ टीमवर हल्ला करण्यात आला. यात एनडीआरएफचा एक जवान गंभीर जखमी झाला.
Sep 11, 2014, 06:21 PM ISTकाश्मिरात महाप्रलय, जवानांची प्राणाची बाजी
जम्मू-काश्मीर खोऱ्यात धो धो पाऊस कोसळला आणि पुराचा महाप्रलय आला. काश्मीर खोऱ्यात २१ हजार सैनिक आपल्या प्राणाची बाजी लावून बचावकार्य करत आहेत.
Sep 10, 2014, 12:53 PM IST
जम्मू-काश्मीरमधून कार चोरुन चार दहशतवादी फरार
श्रीनगरमधील एक कार हायजॅक झाल्यानं खळबळ माजली आहे. जम्मू-श्रीनगर हायवेवर ही कार हायजॅक झाली. या कारचा रजिस्ट्रेशन नंबर हा पंजाबमधला आहे. सध्या या कारचा शोध घेण्याचं काम युद्ध पातळीवर सुरु झालंय. या घटनेमुळं जम्मू काश्मीरमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आलाय. त्याचप्रमाणे स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमिवर सुरक्षेत मोठ्या प्रमाणात वाढ करण्याचा निर्णयही घेण्यात आलाय.
Aug 13, 2014, 04:38 PM ISTमोदींना मत देणाऱ्यांनी समुद्रात बुडावं- फारुख अब्दुल्ला
आपल्याला जातीयवादी शक्तींपासून वाचवण्यासाठी देवाकडे प्रार्थना करा तरच आपण पुढे जाऊ शकू असं वक्तव्य फारुक अब्दुल्ला यांनी कश्मीर मधील प्रचारसभेत केलंय. भारत जातीयवादी होऊ शकत नाही तसे झाल्यास काश्मीर भारतात राहणार नाही असंही ते म्हणालेत. श्रीनगरमधील खन्यार इथं प्रचार सभेत बोलत होते.
Apr 28, 2014, 01:30 PM ISTअतिरेकी हल्ल्यात दोन भारतीय जवान शहीद
श्रीनगरमध्ये पुन्हा अतिरेक्यांनी केंद्रीय राखीव पोलीस दलाला टार्गेट केले. अतिरेक्यांनी केलेल्या हल्यात दोन जवान शहीद झाले. गस्तीवर असलेल्या पोलीस दलावर हा हल्ला करण्यात आला.
Nov 7, 2013, 08:47 PM ISTकाश्मीरमध्ये तब्बल ४० दहशतवादी घुसलेत
काश्मीरच्या केरन सेक्टरमध्ये एका गावात तब्बल ४० दहशतवादी घुसलेत.त्यांच्याशी आर्मीचा गेल्या १० दिवसांपासून संघर्ष सुरू आहे. दहशतवादी आणि आर्मी यांच्यात जोरदार गोळीबार सुरू आहे. आज चकमकीचा दहावा दिवस आहे.
Oct 3, 2013, 02:14 PM ISTश्रीनगरमधील अतिरेकी हल्ल्यात ५ पोलीस जखमी
श्रीनगर शहरातील सौरामधील अहमदनगर भागत दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत पाच पोलीस जखमी झाले आहेत. या भागात अतिरेकी घुसल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी या भागाल घेरले. याचवेळी अतिरेक्यांनी बॉम्बहल्ला केला.
Oct 3, 2013, 09:11 AM ISTश्रीनगरमध्ये लष्कराच्या ताफ्यावर अतिरेकी हल्ला, एक जखमी
श्रीनगरच्या संतनगरमध्ये गोळीबार करण्यात आला आहे. हा हल्ला लष्कराच्या ताफ्यावर करण्यात आला आहे. या गोळीबारात एकजण जखमी झाला आहे. संपूर्ण परिसराला सैन्याने घातला वेढा असून अतिरेकी लपल्याची शक्यता वर्तविण्यात आला आहे.
Sep 28, 2013, 03:03 PM ISTकाश्मिरी भारतीय नाहीत का? - ओमर अब्दुल्ला
काश्मिरी नागरिकांकडे ते जणू भारतीय नाहीतच याच नजरेने पाहिले जाते. त्यांना देशाच्या नागरिकांपेक्षा वेगळीच वागणूक दिली जात आहे, असा अजब दावा करत जम्मू-कश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी जम्मू-काश्मीरवर अन्याय होत असल्याचा आरोपच केला.
Aug 16, 2013, 09:47 AM ISTसुरक्षा गार्ड एटीएम मशीन फोडतो तेव्हा...
कुंपनाचे शेत खात तर असेल तर करायचं काय? अशी म्हण प्रचलित आहे. हीच बाब भारतीय स्टेट बॅंकेच्याबाबतीत घडलेय. या बॅंकेच्या एटीएम मशीनसाठी सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आला होता. याच सुरक्षा रक्षकाने एटीएम मशीन तोडून २३ लाखांवर डल्ला मारला.
Jul 18, 2013, 11:12 AM ISTदहशतवादी हल्ल्यानंतरही पंतप्रधान-सोनिया काश्मीर दौऱ्यावर
पंतप्रधान मनमोहन सिंह आणि सोनिया गांधी आज जम्मू काश्मीरच्या दौऱ्यावर जाणार आहेत. श्रीनगरमध्ये हिजबुल मुजाहिदीनच्या दहशतवाद्यांनी काल केलेल्या हल्ल्यात आठ जवान शहीद झाले होते.
Jun 25, 2013, 10:31 AM IST