काश्मिरी भारतीय नाहीत का? - ओमर अब्दुल्ला

काश्मिरी नागरिकांकडे ते जणू भारतीय नाहीतच याच नजरेने पाहिले जाते. त्यांना देशाच्या नागरिकांपेक्षा वेगळीच वागणूक दिली जात आहे, असा अजब दावा करत जम्मू-कश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी जम्मू-काश्मीरवर अन्याय होत असल्याचा आरोपच केला.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Aug 16, 2013, 09:47 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, श्रीनगर
काश्मिरी नागरिकांकडे ते जणू भारतीय नाहीतच याच नजरेने पाहिले जाते. त्यांना देशाच्या नागरिकांपेक्षा वेगळीच वागणूक दिली जात आहे, असा अजब दावा करत जम्मू-कश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी जम्मू-काश्मीरवर अन्याय होत असल्याचा आरोपच केला.
काश्मिरमधील बक्शी स्टेडियमवर स्वातंत्र्यदिनानिमित्त ओमर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर ओमर यांनी धक्कादायक वक्तव्य केले. काही मंडळी किश्तवाड दंगलीचे भांडवल करून राजकीय लाभ उठवण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोपही ओमर यांनी यावेळी केला.
किश्तवाडची दंगल ही घटना दु:खदायक आहे. राज्यातील कायदा व सुव्यवस्था आणि शांतता बिघडविण्यासाठीच ही दंगल घडविण्यात आली, असा दावाही त्यांनी यावेळी केला.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.