शाहरुखसाठी प्रियांका आली धावून
मला भारतीय असल्याचा गर्व आहे आणि मला फुकटचे सल्ले नकोत, असं सांगत शाहरुखनं वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. याच शाहरुखसाठी त्याची अत्यंत जवळची मैत्रिण मानली जाणारी प्रियांका चोप्रा धावून आलीय.
Jan 30, 2013, 10:59 AM ISTमला भारतीय असल्याचा अभिमान - शाहरुख खान
मला भारतीय असल्याचा गर्व असल्याचं शाहरुख खान याने ठणकावून सांगितलं आहे. मी असुरक्षित वाटत असल्याचं मी कधीच म्हटलं नाही. आधी माझे लेख वाचा, मग बोला असा सल्ला शाहरुख खानने दिला आहे. प्रत्येक जाती, धर्माच्य़ा लोकांकडून मला प्रेम मिळालं. माझे संपूर्ण कुटुंब एक मिनी इंडिया आहे - शाहरुख खान.
Jan 29, 2013, 09:35 PM IST`शाहरुखच्या सुरक्षेची काळजी पाकनं करू नये`
रेहमान मलिक यांच्या बेताल वक्तव्यावर राजकीय पक्षांनी टीकेची झोड उठवलीय. ‘भारताच्या अंतर्गत प्रश्नावर बोलण्यापेक्षा पाकिस्तानात अराजकता माजलीय, त्याकडे लक्ष द्यावं’ अशी तिखट प्रतिक्रिया काँग्रेसनं व्यक्त केलीय.
Jan 29, 2013, 02:47 PM ISTशाहरुखला सुरक्षा द्या, पाक गृहमंत्र्यांचा भारताला अनाहूत सल्ला
बॉलिवूड अभिनेता शाहरुख खाननं केलेल्या वक्तव्यावरून निर्माण झालेल्या वादात आता पाकिस्तानचे गृहमंत्री रेहमान मलिक यांनी उडी घेतलीय. ‘शाहरुख खानला भारत सरकारनं सुरक्षा पुरवावी’ असा अनाहूत सल्ला मलिक यांनी भारताला दिलाय.
Jan 29, 2013, 09:59 AM ISTशाहरुखला हाफिझ सईदचं आमंत्रण
२६/११च्या मुंबई हल्ल्याचा आरोपी आणि जमात-उद-दवाचा म्होरक्या हाफिझ मोहम्मद सईद याने बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान याचा ‘९/११च्या घटनेनंतर मुस्लिम म्हणून मला काय वाटतं?’ हा लेख वाचला आणि त्याला पाठिंबा देत पाकिस्तानात येण्याचं आमंत्रण दिलं आहे.
Jan 27, 2013, 03:49 PM IST`फोर्ब्स`च्या कव्हर पेजवरचा पहिला भारतीय अभिनेता...
बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानची लोकप्रियता फक्त देशातच नाही तर परदेशांतही चर्चेचा विषय ठरलाय. काही ना काही कारणामुळे शाहरुख नेहमीच चर्चेत असतो. मिळालेल्या माहितीनुसार, जगभरात प्रसिद्ध असलेल्या ‘फोर्ब्स’ मॅगझिनच्या कव्हरपेजवर शाहरुख खानचं वर्चस्व दिसणार आहे.
Jan 24, 2013, 10:12 AM ISTशाहरुखने व्यक्त केल्या आपल्या मुस्लिम असल्याबद्दलच्या भावना
“माय नेम इज खान, अँड आय ऍम नॉट अ टेररिस्ट” असं म्हणत मुस्लिम धर्मियांच्या भावना शाहरुख खानने काही वर्षांपूर्वी ‘माय नेम इज खान’ सिनेमात मांडल्या होत्या. एका नियतकालिकाशी बोलताना शाहरुखने पुन्हा एकदा या विषयावर आपलं मत मांडलं आहे.
Jan 23, 2013, 04:39 PM ISTजेव्हा सलमान शाहरुखसाठी बॅटींग करतो...
सध्या कलर्स वाहिनीवर सुरू असलेल्या ‘बिग बॉस’ या रिअॅलिटी शोमध्ये बॉलिवूडच्या दबंग खान चक्क आपला प्रतिस्पर्धी शाहरुख खानची पाठराखण करताना दिसला... थोडं आश्चर्य वाटलं का वाचून... होय ना, पण हे खरं आहे.
Jan 1, 2013, 01:25 PM ISTपुरुष असल्याची लाज वाटतेय - शाहरुख खान
शाहरुख पुढे म्हणतो, आपल्या समाजानं आणि संस्कृतीमध्ये बलात्कार म्हणजे कामुकतेचं प्रतीक मानलं जातं. मला माफ कर कारण मीही याच समाजाचा आणि संस्कृतीचा एक भाग आहे.
Dec 29, 2012, 03:52 PM ISTप्रियांकाची `पीए`गिरी केली नाही - शाहरुख खान
आपला आगामी सिनेमा ‘हॅप्पी न्यू इयर’ बाबतीत मीडियामधून लोकांसमोर येणाऱ्या बातम्यांबद्दल किंग खान खूपच नाराज झालाय. आपला हा राग त्यानं सोशल वेबसाईटच्या माध्यमातून लोकांसमोर व्यक्त केलाय.
Dec 18, 2012, 12:40 PM ISTप्रियंकाच्या बाबतीत शाहरुखचा संयम सुटला
काही फॅन्सचं म्हणणं होतं, की प्रियंका चोप्राने शाहरुखला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढलं आहे. मात्र यावर ना शाहरुखने काही स्पष्टिकरण दिलं ना प्रियंकाने. मात्र नुकत्याच एका अवॉर्ड फंक्शनमध्ये शाहरुखचा संयम सुटला.
Dec 5, 2012, 03:49 PM ISTप्रियंका चोप्राची सलमानशी वाढती जवळीक
प्रियंका चोप्रा आणि शाहरुख खान यांच्या मैत्रीमुळे काही महिन्यांपूर्वी बॉलिवूडमध्ये हाहःकार निर्माण झाला होता. शाहरुख आणि प्रियंकाच्या जवळीकीमुळे शाहरुखच्या वैवाहीक आयुष्यातही वादळ निर्माण झालं होतं. मात्र शाहरुखने दूर केल्यावर प्रियंकाने सलमान खानशी मैत्री वाढवली आहे.
Dec 4, 2012, 08:55 PM ISTआमिर म्हणतोय, `खान` मी वेगळा!
तिसरा खान मात्र या आपल्या दोन स्पर्धक ‘खान’ बरोबर अगदी आपल्या पद्धतीनं समीकरण बनवतो... आणि तो खान म्हणजे आमिर खान...
Nov 24, 2012, 07:52 PM ISTबॉलिवूडमध्ये रोमान्सचं `जान`दार पुनरागमन
य़श चोप्रांनी भारतीय सिनेमांना रोमान्स दिला. त्यातील निरागसता, नाट्य, गोडवा या गोष्टींनी यशजींनी हिंदी सिनेमा समृद्ध केला. त्यांच्या सिनेमांचा परिपाक ‘जब तक है जान’ मध्ये पाहायला मिळतं. रोमांसचा बादशाह शाहरुख खान याला पुन्हा एकदा रोमँटिक स्वरुपात सादर करूनच यश चोप्रांनी देह ठेवला आहे.
Nov 13, 2012, 03:43 PM ISTशाहरुखने कतरिनाला `हिंदी`पासून वाचवलं
कतरिना कैफचं हिंदी खरोखरच ‘माशाल्ला’ आहे, हे सगळ्यांनाच माहीत आहे. तिला हिंदीचं ज्ञान नसूनही ती आज बॉलिवूडमध्ये टॉपच्या अभिनेत्रींपैकी एक बनली आहे. याचं प्रमाण म्हणजे जेव्हा तिच्या हिंदीवर प्रश्नचिन्ह उभं केलं गेलं, तेव्हा सुपरस्टार शाहरुख तिच्या मदतीला धावून आला
Nov 12, 2012, 05:34 PM IST