भाजपने आयात केलेले विजयी उमेदवार
भाजपने निवडणुकीच्या तोंडावर अनेक उमेदवार आयात केले आणि त्यांना उमेदवारी दिली. या उमेदवारांपैकी २२ जणांना भाजपच्या विजयात मोठा वाटा असल्याचे स्पष्ट झाले आहे. भाजपने जवळपास ५९ उमेदवार आयात केले मात्र त्यातील निम्यापेक्षा जास्त उमेदवारांना मतदारांनी घरी बसविले.
Oct 19, 2014, 06:38 PM ISTभाजपचा ऐतिहासिक विजय! मोदींची ट्विटरवरून प्रतिक्रिया
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विटरवरून दोन्ही राज्यात भाजपला यश दिल्याबद्दल सर्व मतदारांचे आभार मानले आहेत. मोदींनी या विजयाला ऐतिहासिक विजय म्हटलंय. तसंच कार्यकर्त्यांनाही धन्यवाद म्हटलंय.
Oct 19, 2014, 06:20 PM ISTमोदी लाट एकहाती सत्ता आणण्यास अपयशी
लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी लाट दिसून आली. केंद्रात मोदींनी एकहाती सत्ता आणण्यात यश मिळवले. मात्र, महाराष्ट्रात भाजपला सत्तेजवळ जाता आले तरी एकहाती सत्ता आणण्यास अपयश आले आहे. त्यामुळे प्रादेशिक पक्षांचा पाठिंबा भाजपला घ्यावा लागणार आहे. त्याशिवाय सत्तेचे स्वप्न पूर्ण करता येणार नाही.
Oct 19, 2014, 06:06 PM ISTदेशात मोदींची लाट कायम, दोन्ही राज्यात मुख्यमंत्री भाजपचाच - शाह
दोन्ही राज्यात भाजपाला मिळालेलं यश हे भाजपा कार्यकर्त्यांचा विजय आहे. देशातील जनता मोदी यांच्या पाठिशी उभी राहिली असून पाठिंब्याबद्दल जनतेचे विशेष आभार मानत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी देशात नरेंद्र मोदींची लाट कायम असल्याचं म्हटलंय.
Oct 19, 2014, 05:40 PM IST...राज्यात सर्वाधिक मताधिक्यानं निवडून आलेला हा उमेदवार!
माजी उपमुख्यमंत्री, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि पक्षाचे बारामती विधानसभा मतदार संघाचे उमेदवार अजित पवार राज्यात सर्वाधिक मताच्या फरकांनी निवडून आलेले उमेदवार ठरलेत.
Oct 19, 2014, 05:34 PM ISTजनतेनं नाकारलं, मनसेचा फुसका बार, दिग्गज गडगडले!
विधानसभा निवडणुकीत तिखट शब्दात विरोधकांवर हल्लाबोल करणाऱ्या राज ठाकरे यांच्या मनसेनं लोकसभेपाठोपाठ विधानसभेतही सपाटून मार खाल्ला आहे. २००९ च्या विधानसभा निवडणुकीत १३ आमदारांसह विधानसभेची पायरी चढणाऱ्या मनसेला यंदाच्या निवडणुकीत अवघ्या एका जागेवर समाधान मानावं लागलंय. मनसेचे बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, प्रवीण दरेकर, शिशीर शिंदे या नेत्यांचा यंदा दारुण पराभव झाला आहे.
Oct 19, 2014, 05:05 PM ISTविदर्भात भाजपचाच 'गड', फडणवीस होणार मुख्यमंत्री?
विदर्भ भाजपसाठी 'गड' ठरलाय. विधानसभेच्या ६२ जागांपैकी तब्बल ४३ जागा भाजपनं जिंकल्या आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी दक्षिण-पश्चिम मतदारसंघातून ४८०४६ मतांनी विजय मिळवलाय.
Oct 19, 2014, 04:38 PM IST