विधानसभा २०१४

ऑडिट विधानसभा मतदारसंघाचं - माण खटाव

माण खटाव विधानसभा मतदारसंघ माढा लोकसभा मतदारसंघात हा मतदारसंघ येतो. तर यंदाच्या विधानसभेच्या आखाड्यात उतरण्यासाठी अनेक जण बाशिंग बांधून बसलेत.

Oct 8, 2014, 03:32 PM IST

ऑडिट विधानसभा मतदारसंघाचं - पाटण

राजकीय आखाड्यातील अत्यंत चुरशीची लढत जर कुठल्या मतदारसंघात होत असेल तर तो सातारा जिल्ह्यातला पाटण विधानसभा मतदारसंघ. गेल्या वेळी विक्रमसिंह पाटणकरांना अवघ्या 580 मतांनी विजय मिळवता आला होता. 

Oct 8, 2014, 03:24 PM IST

ऑडिट जालना जिल्ह्याचं

स्टील सिटी, बियाण्यांची पंढरी, कापडाची मराठवाड्यातली सर्वात मोठी बाजारपेठ अशी जालन्याची ओळख. त्यामुळे राजकीय दृष्ट्याही जालना हा मराठवाड्यातील एक अत्यंत महत्वाचा जिल्हा.

Oct 8, 2014, 03:20 PM IST

ऑडिट विधानसभा मतदारसंघाचं - घनसावंगी

राष्ट्रवादी काँग्रेसचा जबरदस्त प्रभाव असलेल्या घनसावंगी मतदारसंघावर राष्ट्रवादीचे नेते राजेश टोपे यांची गेल्या 15 वर्षांपासून एकहाती सत्ता आहे. टोपेंचा हा मजबूत गड नेस्तनाबूत करण्यासाठी यावेळी विरोधकांनी ताकत लावण्यास सुरुवात केलीय. त्यामुळे या मतदार संघात होणाऱ्या लढतीकडे आतापासूनच अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलंय.

Oct 8, 2014, 03:18 PM IST

ऑडिट विधानसभा मतदारसंघाचं - भोकरदन

केंद्रीय राज्यमंत्र्यांचा बालेकिल्ला अशी ओळख झालेल्या भोकरदन विधानसभा मतदार संघात गेल्या १२ वर्षांपासून मात्र राष्ट्रवादीची सत्ता आहे. दानवेंनी खासदारकी जिंकली असली तरी त्यांच्या पत्नी निर्मला दानवेंना मात्र राष्ट्रवादीच्या चंद्रकांत दानवेंकडून पराभव स्वीकारावा लागलाय. 

Oct 8, 2014, 03:14 PM IST

ऑडिट विधानसभा मतदारसंघाचं - जालना

आलटून पालटून एकेकाला आमदार बनवणारा मतदार संघ म्हणून जालना विधानसभा मतदार संघाची ख्याती आहे. गेल्या २५ वर्षांपासून या मतदार संघात एकदा शिवसेना आणि एकदा काँग्रेसचा आमदार निवडून येण्याची जशी काही प्रथाच पडलीय. त्यामुळे या मतदार संघातून यंदा कोण बाजी मारणार हा औत्सुक्याचा विषय बनलाय.

Oct 8, 2014, 03:04 PM IST

ऑडिट सिंधुदुर्ग जिल्ह्याचं

दुर्ग किल्यामुळे ओळख लाभलेला हा सिंधुदुर्ग जिल्हा... लाल तांबड्या मातीतला इरसाल कोकणीपणा ते मच्छी-सोलकढीपर्यंत अनेक वैशिष्ठ्याने सजलेला हा सिंधुदुर्ग जिल्हा.

Oct 8, 2014, 02:07 PM IST

ऑडिट विधानसभा मतदारसंघाचं - कणकवली

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली मतदार संघातून भाजपचे प्रमोद जठार हे आमदार आहेत. गेल्यावेळी त्यांना अवघ्या ३४ मतांनी विजयी मिळाला होते. आता त्यांचा सामना होणार आहे तो नारायण राणेंचे पुत्र नितेश नारायण राणे यांच्याशी... 

Oct 8, 2014, 02:05 PM IST

ऑडिट विधानसभा मतदारसंघाचं - कुडाळ

अथांग पसरलेला समुद्र, किल्ले सिंधुदुर्ग आणि कुडाळचा रमणीय परीसर असा हा कुडाळ विधानसभा मतदार संघ, १९९० पासून नारायण राणेंचा हा बालेकिल्ला.

Oct 8, 2014, 02:02 PM IST

ऑडिट विधानसभा मतदारसंघाचं - सावंतवाडी

खरंतर सिंधुदुर्ग म्हणजे नारायण राणे आणि नारायण राणे म्हणजे सिंधुदुर्ग असं समीकरण गेल्या काही वर्षात बनलं आहे. पण सावंतवाडीचे आमदार दिपक केसरकर यांनी राणेंविरोधात दंड थोपटले आहेत. राणेंना विरोध करण्यासाठी त्यांनी राष्ट्रवादीला रामराम करत शिवसेनेचा भगवा हाती घेतलाय. त्यामुळे सावंतवाडीतील राजकारणाला वेगळं वळणं मिळालंय.

Oct 8, 2014, 01:58 PM IST

ऑडिट - बुलढाणा जिल्ह्याचं

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मातोश्री राष्ट्रमाता जिजाऊचं जन्म स्थळ असलेलं सिंदखेडराजा, खाऱ्या पाण्यासाठी जगप्रसिद्ध असलेल लोणार सरोवर, विदर्भाची पंढरी श्रीसंत गजानन महाराज यांची संतनगरी शेगाव हि खर्या अर्थाने बुलढाणा जिल्ह्याची ओळख आहे. 

Oct 8, 2014, 01:49 PM IST

ऑडिट विधानसभा मतदारसंघाचं - चिखली

नागपूरनंतर विदर्भातील राष्टीय स्वयंसेवक संघाची सर्वात मोठी ताकद चिखली तालुक्यात असल्याच म्हटलं जातं... बुलढाणा जिल्ह्याची राजकीय राजधानी म्हणूनसुद्धा चिखलीकडे बघितलं जातं. हा मतदार संघ सध्या कॉंग्रेसच्या ताब्यात आहे. कॉंग्रेसचे विद्यमान आमदार राहुल बोंद्रे यांनी त्यांच्या पाच वर्षांच्या कारकिर्दीत काय केलं ते पाहूया...

Oct 8, 2014, 01:46 PM IST