लातूर

शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसू नका - राज ठाकरे

राज्य आणि केंद्र सरकारने नेहमीप्रमाणे शेतक-यांच्या तोंडाला पानं न पुसता गारपीटग्रस्तांना तात्काळ मदत करावी, अशी मागणी राज ठाकरे यांनी केलीय. राज यांनी संकटग्रस्त कुटुंबाला 1 लाख रूपयांची मदत केली.

Mar 12, 2014, 07:15 PM IST

राज ठाकरेंनी हात जोडले, म्हणाले धीर धरा!

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे आजपासून गारपिटीग्रस्तांच्या व्यस्था जाणून घेण्यासाठी मराठवाडा दौऱ्यावर आहेत. राज यांनी शेतकऱ्यांना हात जोडून विनंती केलेय. तुम्ही हिंमत धरा, बाकी मी बघतो, असा धीर देत शेतकऱ्यांना आवाहन केले. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे वीजबिल माफ करा, अशी मागणी राज यांनी यावेळी केली.

Mar 12, 2014, 03:47 PM IST

एड्सबाधित विद्यार्थ्याला विद्यालय प्रवेश नाकारला

लातूरच्या औसा तालुक्यातल्या हासेगावमध्ये एका एड्सबाधित विद्यार्थ्याला शिक्षणाच्या हक्कापासून वंचित ठेवल्याची घटना उजेडात आलीय. कागदपत्रांची पूर्तता करुनही हा प्रवेश नाकारण्यात आल्यानं ‘आम्ही सेवक’ या संघटनेकडून या विद्यालयावर कारवाईची मागणी होतेय.

Dec 1, 2013, 06:20 PM IST

संबंधांची मागणी : तिने बापाचा काढला काटा

बापाला लाज आणणारी घटना लातूरमध्ये नऊ दिवसानंतर उघड झाली आहे. पोटच्या मुलीकडे शारीरिक संबंधाची मागणी करणाऱ्या बापालाच तिने धडा शिकवला.

Oct 3, 2013, 11:05 AM IST

बसमधील स्फोट फटाक्यांमुळेच - आर आर

चाकूर तालुक्यातील नळेगाव येथे शुक्रवारी झालेल्या बसमधील स्फोट हा फटाके आणि शोभेच्या दारूमुळे झाल्याचे गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी आज सांगितले.

May 12, 2013, 04:04 PM IST

लातूर-उदगीर एसटीत स्फोट, १९ जण जखमी

लातूर उदगीर मार्गावरील नळेगाव येथील बस डेपोमध्ये आज सायंकाळी एसटीमध्ये स्फोट होऊन १९ जण जखमी झाले. यातील दोघांची प्रकृती चिंताजनक आहे.

May 10, 2013, 09:16 PM IST

राज-अमित देशमुख यांची गुप्त खलबते?

शासकीय विश्रामगृहावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्य़क्ष राज ठाकरे, लातूरचे आमदार अमित देशमुख आणि पालकमंत्री सतेज पाटील यांच्या गुप्त बैठक झाली असून त्याला चा राष्ट्रवादी काँग्रेसने आक्षेप घेतला आहे.

Feb 25, 2013, 05:45 PM IST

त्याची मजा दुसऱ्याच्या जीवावर बेतली

एखाद्याची मजा दुस-यासाठी सजा होऊ शकते याचा प्रत्यय आला लातूरमधल्या यादव कुटुंबीयाना. शहरातल्या बसस्थानकासमोरून बाईकवरून जात असताना जवळच्याच बारमधून फेकलेली बाटली राजेभाऊ यादव या शेतक-याच्या डोक्यावर बसली आणि ते कोमात गेले. गेला दीड महिना राजेभाऊंवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

Feb 2, 2013, 09:34 PM IST

विलासराव अनंतात विलीन, महाराष्ट्रावर सुतकी कळा

केंद्रीय मंत्री आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्यावर बाभळगाव येथील घराजवळील वडीलोपार्जित शेतात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

Aug 15, 2012, 05:12 PM IST

गर्भपात आणि मृत्यूचं समीकरण पुन्हा जुळलं...

बीड जिल्ह्यापाठोपाठ लातूर शहरात गर्भपातानंतर महिलेचा मृत्यू झाल्याचं समोर आलंय. रेणापूर तालुक्यातील कुंभारवाडी इथल्या मुक्ता राजुरे या महिलेचा गर्भपातानंतर मृत्यू झालाय. त्यानंतर प्रशासनाला खडबडून जाग आलीय.

Jun 21, 2012, 12:06 PM IST

विलासरावांच्या लातुरात दुष्काळ

राज्याच्या इतर भागाप्रमाणे मराठवाड्याला दुष्काळाचा झळा बसतायेत. लातूर जिल्ह्यातल्या औसा तालुक्यात तर दुष्काळाची तीव्रता जरा जास्तच आहे. मात्र तिथल्या नेत्यांना दुष्काळाची फारशी चिंता असल्याचं दिसत नाही.

May 17, 2012, 03:56 PM IST

पाच महापालिकांच्या रणसंग्रामाचा आज निकाल

राज्यातील पाच महापालिकांच्या निवडणुकांचे निकाल आज हाती येणार आहेत. लातूर महापालिकेच्या मतमोजणीला सुरूवात झाली असून मालेगाव, परभणी आणि भिवंडी यांची मतमोजणी सकाळी ९ वाजता सुरू होणार आहे. तर चंद्रपुरात मतमोजणीला सकाळी १० वाजता सुरूवात होईल, अशी माहिती निवडणूक अधिकाऱ्यांनी दिली आहे.

Apr 16, 2012, 10:51 AM IST

५ पालिकांसाठी मतदान सुरू, प्रतिसाद अत्यल्प

राज्यातल्या पाच महापालिका निवडणुकीच्या मतदानाला सुरुवात झाली आहे. भिवंडी, मालेगाव, लातूर, चंद्रपूर आणि परभणीत मतदान होत आहे. मतदानकेंद्राबाहेर मतदानासाठी मतदारांच्य़ा अत्यल्प असा प्रतिसाद दिसून आला.

Apr 15, 2012, 11:44 AM IST

हळद, आल्याच्या पिकातून लाखोंचं उत्पन्न

लातूर तालुक्यातील भिसे वाघोळी या गावातील बसवराज मोदी यांनी ऊस शेतीला समाधानकारक दर मिळत नसल्याने दीड एकरावर हळद आणि आर्ध्या एकरावर आले पिकाची लागवड केली.

Jan 13, 2012, 08:49 PM IST

मृतदेहांचीही विटंबना

दान केलेल्या मृतदेहांची विटंबना होत असल्याचा धक्कादायक प्रकार लातूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उघडकीस आलाय. 'झी २४ तासच्या टीम'नं या मृतदेहांच्या विटंबनेचा हा धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आणलाय.

Dec 21, 2011, 06:26 PM IST