५ पालिकांसाठी मतदान सुरू, प्रतिसाद अत्यल्प

राज्यातल्या पाच महापालिका निवडणुकीच्या मतदानाला सुरुवात झाली आहे. भिवंडी, मालेगाव, लातूर, चंद्रपूर आणि परभणीत मतदान होत आहे. मतदानकेंद्राबाहेर मतदानासाठी मतदारांच्य़ा अत्यल्प असा प्रतिसाद दिसून आला.

Updated: Apr 15, 2012, 11:44 AM IST

www.24taas.com, मुंबई

 

राज्यातल्या पाच महापालिका निवडणुकीच्या मतदानाला सुरुवात झाली आहे. भिवंडी, मालेगाव, लातूर, चंद्रपूर आणि परभणीत मतदान होत आहे. मतदानकेंद्राबाहेर मतदानासाठी मतदारांच्य़ा अत्यल्प असा प्रतिसाद दिसून आला. भिवंडी निजापूर महापालिकेसाठी मतदानाला सुरुवात झाली आहे. एकूण ९० जागांसाठी मतदान सुरु आहे. निवडणुकीसाठी ६३२ उमेदवार रिंगणात आहेत. ४ लाख ६९ हजार १४५ मतदार या उमेदवारांचं भविष्य ठरवणार आहेत.

 

पंधरा राजकीय पक्ष आणि आघाड्य़ांच्या माध्यमातून उमेदवार आपलं नशीब आजमावत आहेत. एकूण ५७१ मतदान केंद्रांवर मतदान सुरु आहे. त्यापैकी २२४ मतदान केंद्रं संवेदनशील आहेत. मालेगाव महापालिका निवडणुकीच्या मतदानाला सुरुवात झाली आहे. एकूण ८० जागांसाठी ४७१ उमेदवार रिंगणात आहेत. ३ लाख ६७ हजार ७८१ मतदार या उमेदवारांचं भविष्य ठरवणार आहेत. ४६७ मतदान केंद्रांवर मतदान सुरु आहे. त्यापैकी २५२ केंद्रं संवेदनशील आहेत.

 

लातूर महापालिकेच्या पहिल्यावहिल्या निवडणुकीला सुरुवात झाली आहे. एकूण ७० जागांसाठी ४१८ उमेदवार रिंगणात आहेत. तब्बल २ लाख ५१ हजार २१० मतदारांच्या हाती या उमेदवारांचं भविष्य आहे. मतदानासाठी प्रशासनाकडून चोख व्यवस्था करण्यात आली असून ३०८ मतदान केंद्रं उपलब्ध करुन देण्यात आली आहेत.

 

चंद्रपूर महापालिकेच्या पहिल्यावहिल्या निवडणुकीच्या मतदानाला सुरुवात झाली आहे. एकूण ६६ जागांसाठी ४५८ उमेदवार रिंगणात आहेत. सुमारे २ लाख ३६ हजार ९९५ मतदारांच्या हाती या उमेदवारांचं भविष्य आहे. मतदानासाठी २९९ मतदान केंद्रं उभारली.

 

परभणी महापालिका निवडणुकीच्या मतदानाला सुरुवात झाली आहे. एकूण ६६ जागांसाठी मतदान सुरु झालं आहे. ४२० उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. २ लाख ३ हजार ४४९ मतदार या उमेदवारांचं भविष्य ठरवणार आहेत. २६६ केंद्रांवर मतदान सुरु असून ४१ केंद्रं संवेदनशील आहेत.