राज ठाकरे पाहणार दुष्काळातील चारा छावण्या
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यातील दुष्काळाबाबत राज्य सरकारला जबाबदार धरले आहे. हा दुष्काळ मानव निर्मित असल्याची शंका उपस्थित केली आहे. आता राज स्वत: दुष्काळातील चारा छावण्यांची पाहणी करणार आहे. त्यासाठी ते खास दौरा करणार आहेत.
Apr 25, 2013, 04:42 PM ISTराज ठाकरेंविरोधात याचिका दाखल
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विरोधातील याचिकेवरील आता सुनावणी होणार आहे. त्यामुळे राज ठाकरेंबाबत काय निकाल लागणार याची उत्सुकता लागली आहे.
Apr 24, 2013, 08:55 PM IST... आणि ठाकरे बंधुंची एकी पुन्हा दिसून आली!
नाशिक मनपा स्थायी समिती सभापतीपदी मनसेचे रमेश घोंगडे विजयी झालेत. घोंगडे १० विरुद्ध ६ मतांनी विजयी झालेत.
Apr 20, 2013, 03:34 PM ISTठाणे बंदला मनसेचा पाठिंबा नाही - राज ठाकरे
अनधिकृत बांधकामांवरील कारवाईविरोधात उद्याच्या ठाणे बंदला मनसेचा पाठिंबा नसल्याची घोषणा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलीय. अनधिकृत बांधकाम करणा-या बिल्डरांना स्थानिक नगरसेवक आमदारांचा पाठिंबा असल्याची टीका राज यांनी केलीय.
Apr 17, 2013, 07:04 PM ISTराज ठाकरे अनधिकृत बांधकामाबाबत काय बोलले?
ठाण्यात मुंब्रा परिसरातील शिळफाट्यामध्ये सात मजली इमारत कोसळली. या अनधिकृत इमारतीला जो कोणी कारणीभूत असेल त्याच्यावर आधी कारवाई झालीच पाहिजे. बिल्डलरा सोडून सर्वांवर कारवाई केली जात आहे. लागेबंधमुळे बिल्डर मोकाट आहे. हे बिल्डर उत्तर प्रदेशातील आहेत, त्यांच्यावर आधी कारवाई करा, अशी मागणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत केली.
Apr 17, 2013, 06:18 PM ISTशिकाऱ्यांची माहिती देणाऱ्यांना राज ठाकरेंकडून पुरस्कार
ताडोबामध्ये वाघाची शिकार करणाऱ्या शिकाऱ्यांना पकडून देणाऱ्या पोलीस अधिकारी, कर्मचारी आणि इतर नागरिकांना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ५ लाख रुपयांचा पुरस्कार दिला आहे.
Apr 16, 2013, 11:01 PM ISTनागपुरात राज ठाकरेंचे जल्लोषात स्वागत
मनसे अध्यक्ष राज ठाकरे २ दिवसाच्या विदर्भ दौऱ्यावर आज नागपूरला पोचले आहेत. आपल्या या दौऱ्या दरम्यान राज ठाकरे नागपूरसह भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातील कार्यकर्त्यांच्या बैठकी घेणार आहेत.
Apr 15, 2013, 02:24 PM ISTराज ठाकरेंची अजित पवारांवर पुन्हा टीका
वादग्रस्त विधानांमुळे अडचणीत आलेले उपमुख्यमंत्री अजित पवारांनी कराडमध्ये गांधीगिरी सुरु केलीय. यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जोरदार टीका केली. आता करून काय उपयोग, असा सवाल राज यांनी उपस्थित केलाय.
Apr 14, 2013, 12:01 PM ISTराज ठाकरे भडकले, दादर आंदोलन घृणास्पद!
दादरमध्ये मनसैनिकांकडून घडलेला प्रकार घृणास्पद आहे. मनसेत अशा प्रकारांना धारा दिला जाणार नाही, अशा कडक शब्दात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसैनिकाची खरडपट्टी काढली आहे.
Apr 10, 2013, 08:08 PM ISTराज ठाकरेंच्या आदेशानंतर मनसे ‘दादां’विरोधात रस्त्यावर
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरोधात मनसे कार्येकर्ते रस्त्यावर आलेत. राज ठाकरेंच्या आदेशानंतर मुंबईत मनसेचं आंदोलन सुरू झालंय. यावेळी या कार्यकर्त्यांनी अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी करत जोरदार घोषणाबाजी केली.
Apr 10, 2013, 11:18 AM ISTराज ठाकरेंना जामीन मिळाला पण.....
मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे सोमवारी जळगाव कोर्टात हजर होते. रेल्वे भरती प्रकरणी राज ठाकरे यांच्यावर जळगावमध्ये गुन्हा नोंदवण्यात आला होता.
Apr 9, 2013, 05:27 PM IST`राज ठाकरेंची सभा उधळून लावू...`
मराठा आरक्षणाला विरोध केल्यानं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं परभणीत पुतळा दहन करण्यात आलं. संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी निदर्शनं करत राज्यात यापुढे राज ठाकरेंची सभा होऊ देणार नसल्याचा इशारा दिलीय.
Apr 9, 2013, 12:47 PM ISTराजना गैरहजर राहण्याची कोर्टाची परवानगी
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना जळगाव जिल्हा सत्र न्यायालयानं जामीन मंजूर केलाय. १५ हजारांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावार त्यांचा जामीन मंजूर करण्यात आलाय. तसंच यापुढे सुनावणीस गैरहजर राहण्याचीही त्यांना परवानगी देण्यात आलीय.
Apr 8, 2013, 02:54 PM ISTराज ठाकरे हाजीर हो....
राज ठाकरेंची आज जळगाव कोर्टात हजेरी आहे. 1 फेब्रुवारी रोजी बजावलेल्या समन्सनंतरही राज ठाकरे कोर्टात गैरहजर राहिल्यानं त्यांना 8 एप्रिल रोजी जळगाव जिल्हा सत्र न्यायालयापुढे हजर राहिण्याचे आदेश देण्यात आले होते.
Apr 8, 2013, 10:13 AM ISTमुंब्र्यातील बिल्डर परप्रांतीय होता – राज
मुंब्र्यात जी इमारत पडली, ती बांधणारा हा परप्रांतीय होता. तर मृत्यूमुखी पडलेल्यांपैकी १०० टक्के हे उत्तरप्रदेशचे आहेत, अशी पोलिसांची माहिती असल्याचे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जळगाव येथील सभेत मुद्दा उपस्थित करून पुन्हा परप्रांतीयांवर हल्लाबोल केला आहे.
Apr 8, 2013, 08:16 AM IST