www.24taas.com, जळगाव
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना जळगाव जिल्हा सत्र न्यायालयानं जामीन मंजूर केलाय. १५ हजारांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावार त्यांचा जामीन मंजूर करण्यात आलाय. तसंच यापुढे सुनावणीस गैरहजर राहण्याचीही त्यांना परवानगी देण्यात आलीय.
१ फेब्रुवारी रोजी बजावलेल्या समन्सनंतरही राज ठाकरे कोर्टात गैरहजर राहिल्यानं त्यांना ८ एप्रिल रोजी जळगाव जिल्हा सत्र न्यायालयापुढे हजर राहिण्याचे आदेश देण्यात आले होते. राज ठाकरे यांचे पुत्र अमित, कन्या उर्वशी, राज ठाकरे यांचा पुतण्या निहारही कोर्टात उपस्थित होते.
उत्तर भारतीयांना केलेल्या मारहाण प्रकरणी १२ जानेवारी २००९ मध्ये रत्नागिरीत राज ठाकरेंना अटक करण्यात आली होती. या अटकेच्या निषेधार्थ जळगावात मनसे पदाधिका-यांनी मोर्चा काढून बंद पुकारला होता.