राजनाथ सिंह

पाकिस्तान दिनासाठी मसरत आलमला निमंत्रण, शिवसेनेचे निदर्शनं

दिल्लीत पाकिस्तान उच्चायुक्तालयात आज पाकिस्तान दिवस साजरा केला जातोय. यावेळी हुर्रियत कॉन्फरन्सचे प्रमुख मीरवाईज उमर फारुख यांच्यासह अनेक फुटीरतावादी नेते सहभागी होणार आहेत. आठवड्याभरापूर्वी उच्चायुक्तालयाकडून निमंत्रण पाठवण्यात आलंय.

Mar 23, 2015, 04:53 PM IST

बलात्काराचा आरोप असणाऱ्या कैद्यावर गहमंत्र्यांची स्तुतीसुमनं...

गृहमंत्री राजनाथ सिंह आणि विश्व परिषदेचे माजी अध्यक्ष अशोक सिंघल सध्या वादात अडकलेत. १६ वर्षांच्या तरुणीवर बलात्काराच्या प्रकरणात सध्या तुरुंगात बंद असलेल्या आसारामवर कौतुकाचा वर्षाव केल्यानं सिंह आणि सिंघल यांच्यावर अनेकांनी टीका केलीय. 

Feb 24, 2015, 09:53 PM IST

गृहमंत्र्यांना भेटले केजरीवाल, दिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा देण्याची मागणी

दिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा देण्याची मागणी आपचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांनी केलीय. यासंदर्भात केजरीवाल यांनी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या निवास्थानी जाऊन त्यांची भेट घेतलीय. 

Feb 11, 2015, 07:54 PM IST

पोलिसांनी ‘SMART’ होण्याची गरज – पंतप्रधान

देशाची गुप्तचर यंत्रणा सक्षम असायला हवी, ज्या देशाची गुप्तचर यंत्रणा सक्षम त्यांना शस्त्रास्त्रांवर अवलंबून राहावं लागत नाही. शस्त्र कोणाच्या हाती आहे हे जास्त महत्त्वाचं आहे, असं मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलंय. आसाममधील गुवाहाटी इथं सुरु असलेल्या ४९व्या राष्ट्रीय पोलीस महासंचालक परिषदेस पंतप्रधान संबोधित करत होते. 

Nov 30, 2014, 12:22 PM IST

राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या नावावर २८ ऑक्टोबरला होणार शिक्कामोर्तब

महाराष्ट्रात मुख्यमंत्रीपदावर भाजपातर्फे कोणाची वर्णी लागणार याचं उत्तर २८ ऑक्टोबर रोजी भाजपाच्या विधीमंडळ पक्षाच्या बैठकीत मिळणार आहे. २८ ऑक्टोबरला मुंबईत भाजपाच्या विधीमंडळ पक्षाची बैठक होणार असून केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह आणि जे.पी. नड्डा हे या बैठकीत निरीक्षक म्हणून उपस्थित राहणार आहेत. 

Oct 26, 2014, 07:59 PM IST

आज बाळासाहेब जिवंत असते तर... - राजनाथ सिंह

गृहमंत्री राजनाथ सिंह सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत... युती तुटल्यानंतर, ऐन निवडणुकीच्या सणात त्यांना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आठवण आलीय.

Oct 10, 2014, 01:32 PM IST

महाराष्ट्रातही भाजपला बहुमत द्या : राजनाथ सिंह

केंद्रीय गृह मंत्री राजनाथ सिंह हे महाराष्ट्राच्या प्रचार दौऱ्यावर आहेत. फक्त केंद्रातच नव्हे तर राज्यातही बहुमत असणे गरजेचे आहे, म्हणून महाराष्ट्रातही भाजपला बहुमत द्या, कारण भाजपची सत्ता असलेल्या राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात विकास झाला आहे, असं केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे.

Oct 9, 2014, 05:06 PM IST

शस्त्रसंधीचं उल्लंघन पाकिस्तानला महागात पडेल- संरक्षणमंत्री

 सीमेवर पाकिस्तानच्या नापाक कारवाया सुरुच आहेत. पाकिस्ताननं पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन केलंय. भारतानं पाकिस्तानच्या या कारवायांची गंभीर दखल घेतली असून पाकिस्तान कडून असेच हल्ले होत राहिल्यास त्याची गंभीर किंमत पाकिस्तानला मोजावी लागेल असा इशारा संरक्षण मंत्री अरुण जेटली यांनी पाकिस्तानला दिलाय.

Oct 9, 2014, 12:35 PM IST