मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प

२९ मार्चला सादर होणार मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प

आशिया खंडातील सर्वात मोठ्या असलेल्या मुंबई महापालिकेचा 2017-18 या वर्षीचा अर्थसंकल्प येत्या बुधवारी, 29 मार्चला स्थायी समिती सभेत सादर केला जाणार आहे. दरवर्षी फुगवून अर्थसंकल्प सादर केला जातो. मात्र यावेळी पहिल्यांदाच ही परंपरा मोडीत काढली जाणार असून यंदाचा अर्थसंकल्प मागील वर्षापेक्षा 10 हजार कोटी रूपयांनी कमी असणार आहे.

Mar 25, 2017, 08:52 AM IST

श्रीमंत महापालिकेचा गरीब कारभार

मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्प आहे 26 हजार 581.2 कोटी रुपयांचा आहे. हे बजेट कोणाच्याही डोळ्यात भरावं असंच आहे..कारण हा आकडाच तेव्हडा मोठा आहे...यंदाचं बजेट 23 हजार कोटी रुपयांचा आकडा पार करील असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता.. पण हे बजेट थेट 26 हजार 581.2 कोटी रुपयांवर जावून पोहोचला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या बजेटमध्ये तब्बल 26 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

Mar 20, 2012, 11:07 PM IST