महाशिवरात्री

महाशिवरात्री : पुजेचे मुहूर्त आणि वेळ

देशात आज सर्वत्र महाशिवरात्रीचा उत्सव साजरा केला जातोय. हिंदू धर्मात या सणाला विशेष महत्त्व आहे. या दिवशी भगवान शंकराची मनोभावे पूजा केली जाते. बेल, दूध शंकराच्या पिंडीवर वाहिले जाते. स्त्रियांसाठी या पुजेचे अधिक महत्त्व आहे. 

Mar 7, 2016, 12:59 PM IST

देशभरात आज महाशिवरात्रीचा उत्साह

राज्यासह देशभरात आज महाशिवरात्रीचा उत्साह पाहण्यास आहे. मुंबईतील बाबुलनाथ मंदिरातही भाविकांनी शिवलिंग दर्शनासाठी गर्दी केली आहे. बाबुलनाथ मंदिर २०० वर्ष जुनं आहे.

Mar 7, 2016, 09:52 AM IST

महाशिवरात्रीनिमित्त झी मराठीवर खंडेरायाचा जागर

बानू-म्हाळसाचा महामुकाबला...

पुणे : अवघ्या महाराष्ट्राचं आराध्यदैवत असलेल्या श्री खंडेरायांची चरित्रगाथा सांगणारी झी मराठीवरील ‘जय मल्हार’ ही मालिका घराघरांत लोकप्रिय आहे. झी मराठी वाहिनीवरून प्रसारित होणा-या या मालिकेची सुरूवात दोन वर्षांपूर्वी झाली आणि या मालिकेने एक इतिहास रचला. 

Mar 4, 2016, 08:36 PM IST

अंबरनाथमधले सफाई कामगार संपावर

अंबरनाथ नगर पालिकेचे एक ते दीड हजार सफाई कर्मचारी सोमवार मध्यरात्रीपासून अचानक संपावर गेले आहेत.

Feb 21, 2012, 11:39 PM IST

महाशिवरात्रीचा दुग्धशर्करा योग!

आज महाशिवरात्र... विशेष म्हणजे सोमवार आणि महाशिवरात्र असा दुग्धशर्करा योग आल्यामुळे सर्वत्र शिवभक्तांच्या उत्साहाला उधाण आलंय. या वर्षी सोमवार आणि महाशीवरात्री एकाच दिवशी आल्याने हे विशेष महापर्व समजलं जातंय.

Feb 20, 2012, 09:01 PM IST

आज घुमणार 'शिवशंभो'चा गजर

आज महाशिवरात्र. मुंबईसह राज्यभर आज महाशिरात्रीचा उत्सव मोठ्या आनंदानं साजरा केला जातो आहे. रात्रीपासूनच ठिकठिकाणच्या मंदिरात जय्यत तयारी करण्यात आली होती. मुंबईतल्या बाबुलनाथ मंदिरातही आज पहाटेपासूनच भाविकांनी दर्शनासाठी रांगा लावल्या आहेत.

Feb 20, 2012, 02:32 PM IST