महाशिवरात्री : पुजेचे मुहूर्त आणि वेळ

देशात आज सर्वत्र महाशिवरात्रीचा उत्सव साजरा केला जातोय. हिंदू धर्मात या सणाला विशेष महत्त्व आहे. या दिवशी भगवान शंकराची मनोभावे पूजा केली जाते. बेल, दूध शंकराच्या पिंडीवर वाहिले जाते. स्त्रियांसाठी या पुजेचे अधिक महत्त्व आहे. 

Updated: Mar 7, 2016, 12:59 PM IST
महाशिवरात्री : पुजेचे मुहूर्त आणि वेळ title=

मुंबई : देशात आज सर्वत्र महाशिवरात्रीचा उत्सव साजरा केला जातोय. हिंदू धर्मात या सणाला विशेष महत्त्व आहे. या दिवशी भगवान शंकराची मनोभावे पूजा केली जाते. बेल, दूध शंकराच्या पिंडीवर वाहिले जाते. स्त्रियांसाठी या पुजेचे अधिक महत्त्व आहे. 

असे म्हणतात की महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शंकराची पुजा करणाऱ्या महिलांना चांगला नवरा मिळतो. या दिवशी भक्तगण उपवास करतात. केवळ दूध, फळे यांचे सेवन करतात. काहीजण तर या दिवशी निर्जळी उपवास करतात. 

या दिवशी भगवान शंकराच्या पुजेसाठी विशिष्ट वेळ आहे. हे आहेत पुजेसाठी मुहूर्त
निशिता काल पुजेची वेळ -  24:24 ते 25:13
पारायणाची वेळ - ८ मार्च ६.५५ ते १०.३४
रात्री पहिल्या प्रहराची पुजा - १८.४२ ते २१.४५
रात्री दुसऱ्या प्रहराची पुजा - २१.४५ ते २४.४९
रात्री तिसऱ्या प्रहराची पुजा - २४.४९ ते २७.५२
रात्री चौथ्या प्रहराची पुजा - २७.५२ ते ३०.५५
चर्तुदर्शी तिथी सुरु - ७ मार्च १३.२० पासून
चर्तुदर्शी तिथी समाप्ती - ८ मार्च १०.३४ पर्यं