महाशिवरात्रीचा दुग्धशर्करा योग!

आज महाशिवरात्र... विशेष म्हणजे सोमवार आणि महाशिवरात्र असा दुग्धशर्करा योग आल्यामुळे सर्वत्र शिवभक्तांच्या उत्साहाला उधाण आलंय. या वर्षी सोमवार आणि महाशीवरात्री एकाच दिवशी आल्याने हे विशेष महापर्व समजलं जातंय.

Updated: Feb 20, 2012, 09:01 PM IST

www.24taas.com,

आज महाशिवरात्र... विशेष म्हणजे सोमवार आणि महाशिवरात्र असा दुग्धशर्करा योग आल्यामुळे सर्वत्र शिवभक्तांच्या उत्साहाला उधाण आलंय. या वर्षी सोमवार आणि महाशीवरात्री एकाच दिवशी आल्याने हे विशेष महापर्व समजलं जातंय.

मुंबईसह राज्यभर आज महाशिवरात्रीचा उत्सव मोठ्या आनंदानं साजरा केला जातोय... भारतातील आठवे जोतिर्लिंग असलेल्या औंढा नागनाथ येथे महाशिवरात्री निमित्त भाविकांनी मोठी गर्दी केलीय. भीमाशंकरमध्येही पहाटेपासूनच भाविकांनी गर्दी केली. तर अंबरनाथ इथल्या अतीप्राचीन शिवमंदिरातही भाविकांनी मोठी गर्दी केली.

त्याचप्रमाणे 'जवा आगळं काशी' अर्थात काशीपेक्षा जवभर श्रेष्ठ अशी ख्याती असलेलं ठिकाण म्हणजे परळी वैजनाथ येथेही महाशिवरात्री निमित्ताने शिवभक्तांच्या दर्शनासाठी रांगा लागल्यात. या ठिकाणी कर्नाटक, आंध्रप्रदेश, गुजरातमधून ४ ते ५ लाख भाविक दाखल झालेत. त्र्यंबकेश्वरमध्येही भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केलीये. राज्यातूनच नाही तर देशभरातून महाशिवरात्रीसाठी भाविक त्र्यंबकेश्वरमध्ये दरवर्षी येत असतात.