महापौर निवडणूक

शिवसेनेला खिंडीत आणि काँग्रेसला कोंडीत पकडण्यासाठी भाजपची खेळी

संपूर्ण देशात मुंबई महापालिकेत शिवसेनेचा की भाजपचा महापौर बसणार याकडे लक्ष लागले आहे. मात्र, शिवसेनेने आमचाच महापौर बसणार असल्याचे म्हटले आहे. मात्र, भाजपला सोबत न घेता सेनेने तयारी दर्शविली आहे. भाजपला सेनेकडून प्रतिसाद मिळत नसल्याने शिवसेनेला खिंडीत आणि काँग्रेसला कोंडीत पकडण्यासाठी हालचाली सुरु केल्यात. 

Mar 1, 2017, 07:15 PM IST

पाहा, काय म्हणतायत कडोंमपाचे नवनिर्वाचित महापौर

पाहा, काय म्हणतायत कडोंमपाचे नवनिर्वाचित महापौर

Nov 11, 2015, 06:36 PM IST

केडीएमसी महापौर निवडणूक बिनविरोध, शिवसेनेची बाजी

कल्याण-डोंबिवली महानगरपालिका महापौर निवडणूक अखेर बिनविरोध झाली आहे. भाजपने आपल्या उमेदवाराचा दाखल केलेला अर्ज मागे घेतला. त्यामुळे शिवसेनेचे उमेदावर राजेंद्र देवळेकर हे बिनविरोध निवडून आलेत. या निवडीनंतर सेनेच्या गोठात मोठा उत्साह दिसून येत आहे.

Nov 11, 2015, 01:03 PM IST

केडीएमसी महापौर निवडणूक : शिवसेनेत मोठी नाराजी, उपजिल्हाप्रमुखांचा सेनेला जय महाराष्ट्र

कल्याण-डोंबवली महानगर पालिकेत जरी शिवसेनेला सर्वाधिक ५२ जागा मिळाल्या तरी महापौरपद कोणाला द्यायचे यावरून मोठा वाद उफाळलाय. थेट उपजिल्हाप्रमुख यांनी बंडाचे निशाण हाती घेत जय महाराष्ट्र केला. तर अन्य दोघे राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत.

Nov 7, 2015, 05:32 PM IST

कल्याण-डोंबिवली महापौर निवडणूक : भाजप उमेदवारांकडून अर्ज दाखल

कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेतील सत्ता स्थापनेच्या हालचालींनी शनिवारी वेग घेतला. शिवसेना उमेदवारांनी अर्ज भरला असताना भाजपनेही शेवटच्या दोन तासात आपल्या दोन्ही उमेदवारांचे अर्ज दाखल केलेत.

Nov 7, 2015, 05:17 PM IST

मनसेचा गड राखण्यासाठी राज ठाकरेंची सत्वपरीक्षा

नाशिकच्या महापौरपदासाठी रणनिती ठरवण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या कृष्णकुंज या निवासस्थानी संध्याकाळी 5 वाजता बैठक होणार आहे. या बैठकीसाठी नाशिकचे आमदार आणि स्थानिक नेते वसंत गिते, सरचिटणीस अतुल चांडक, स्थायी समिती अध्यक्ष राहुल ढिकले मुंबईत दाखल झाले आहेत. 

Sep 10, 2014, 02:34 PM IST

उद्धव ठाकरेंच्या ‘महापालिका’ एंट्रीवर विरोधकांचा गोंधळ!

मुंबई महापालिकेत महापौर निवडीदरम्यान विरोधकांनी गोंधळ घातला. महापौरपदी निवडून आलेल्या स्नेहल आंबेकर यांचं अभिनंदन करण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सभागृहात आले.

Sep 9, 2014, 03:42 PM IST

उपमुख्यमंत्री अजित पवारांना अमरावतीत जोरदार धक्का

 अमरावती महापौर निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवारांना जोरदार धक्का बसलाय. राष्ट्रवादीला डावलून काँग्रेसनं संजय खोडके गटाला पाठिंबा दिला.

Sep 9, 2014, 01:11 PM IST