मुंबई: मुंबई महापालिकेत महापौर निवडीदरम्यान विरोधकांनी गोंधळ घातला. महापौरपदी निवडून आलेल्या स्नेहल आंबेकर यांचं अभिनंदन करण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सभागृहात आले.
त्यावेळी उपमहापौरपदाची निवडणूक सुरू होती. त्यामुळं ठाकरेंच्या एंट्रीवर जोरदार आक्षेप घेत विरोधकांनी गोंधळ घातला. आंबेकर यांचे अभिनंदन करण्यासाठी सभागृहात गेले. ठाकरेंच्या एन्ट्रीवर विरोधकांनी आक्षेप घेतला. तसंच मतदाना दरम्यान जोरदार गोंधळ घातला.
दरम्यान, मुंबईच्या महापौरपद निवडणुकीत शिवसेनेच्या सौ. स्नेहल आंबेकर यांनी बाजी मारत मुंबई शहराचा प्रथम नागरीक होण्याचा मान पटकावला. त्यांनी काँग्रेस उमेदवार प्रियतमा सावंत यांचा ५७ मतांनी पराभव केला. शिवसेनेच्या नगरसेविका स्नेहल आंबेकर या पहिला महिला अनुसूचित जातीच्या महापौरपद झाल्यात. तर
उपमहापौरपदी भाजपच्या अलका केरकर या विजयी झाल्या आहेत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.