उपमुख्यमंत्री अजित पवारांना अमरावतीत जोरदार धक्का

 अमरावती महापौर निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवारांना जोरदार धक्का बसलाय. राष्ट्रवादीला डावलून काँग्रेसनं संजय खोडके गटाला पाठिंबा दिला.

Updated: Sep 9, 2014, 01:11 PM IST
उपमुख्यमंत्री अजित पवारांना अमरावतीत जोरदार धक्का title=

अमरावती : अमरावती महापौर निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवारांना जोरदार धक्का बसलाय. राष्ट्रवादीला डावलून काँग्रेसनं संजय खोडके गटाला पाठिंबा दिला.

 अमरावती महापौर निवडणूक अजित पवार यांच्यासाठी ही प्रतिष्ठेची लढाई होती. काँग्रेसच्या पाठिंब्यामुळे खोडके गटाच्या वरनजीतकौर नंदा विजयी झाल्या.

खोडके गटाला या निवडणुकीत 47 मतं मिळाली. शिवसेनेला 21 तर एनसीपीला केवळ 7 मतं मिळाली. काँग्रेसच्या शेख जाफर या उप-महापौपदी निवडणून आल्या. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.