मंगळयान मिशन

मंगळयान मिशन: पुढील १५ दिवसाकरता मंगळयानशी संपर्क तूटणार

भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्त्रोचा मंगळ ग्रहाभोवती फिरणाऱ्या मंगळयानशी संपर्क तूटणार असल्याचं शास्त्रज्ञांनी सांगितलं आहे. उद्यापासून म्हणजेच ८ जून ते २२ जून या पंधरा दिवसांकरता मंगळयानाशी संपर्क तूटणार आहे. 

Jun 7, 2015, 01:38 PM IST

यशस्वी 'मंगळ'झेपीनंतर सेलिब्रिटींचा 'इस्त्रो'वर शुभेच्छांचा वर्षाव

 भारतीय संशोधकांचं यश आणि मंगळावरील झेपीनंतर सेलिब्रिटी आणि राजकीय नेत्यांनी इस्त्रोवर शूभेच्छांचा वर्षाव केलाय. ट्विटरवर #Mangalyaan करून अनेक सेलिब्रिटींनी शुभेच्छा दिल्या आहेत. 

Sep 24, 2014, 12:51 PM IST

मंगळयानावर कोणत्या सोपवण्यात आल्यात जबाबदाऱ्या

भारताचा मंगळयान जेव्हा मंगळाभोवती फिरुलागेल तेव्हा तो आपलं काम सुरु करेल. या मंगळयानावर कोणत्या जबाबदा-या सोपवण्यात आल्यात? त्यावर कोणत्या प्रकारची हायटेक यंत्रणा लावण्यात आलीये, याबाबत माहिती.

Sep 24, 2014, 07:54 AM IST

मंगळयान मोहीम फत्ते, इस्त्रोचा ऐतिहासिक दिवस

मंगळयान आज 24 सप्टेंबरला मंगळाच्या कक्षेत स्थिरावले. मंगळयानाच्या मुख्य लिक्विड इंजिनाची चाचणी यशस्वी झाली आणि आज सकाळी ७.२१ मिनिटांनी मंगळयान मंगळग्रहावर पोहोचले. अंतराळ मोहीमेच्या इतिहासात भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्त्रो) सुवर्ण अक्षरात नोंद करत पहिल्याच प्रयत्नात मंगळयान मोहीम यशस्वी केली. सकाळी ७.४५ वाजता सुमारास मंगळयानाने मंगळाच्या गुरुत्वाकर्षण कक्षेत प्रवेश केला आणि मंगळ मोहीम फत्ते झाली. यामुळे इस्त्रोच्या शिरपेचात मानाचा आणखी एक तुरा रोवला गेला आहे. हे भारताचे मोठे यश आहे. जगातील मोजक्यात देशांमध्ये पंक्तित भारत जाऊन बसला आहे.

Sep 24, 2014, 07:25 AM IST