बॉलीवुड न्यूज

लढाई हा माझ्या जीवनाचा नियम झाला आहे- कंगना रणावत

आपल्या स्पष्टवक्तेपणा आणि बिनधास्त अंदाजाने प्रसिद्ध असलेली अभिनेत्री कंगना राणावतचा नवा चित्रपट 'सिमरन" लवकरच प्रदर्शित होत आहे. याचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला. या ट्रेलर लाँचमध्ये तिने सांगितले की, आजपर्यत मी जे काही मिळवले ते लढवू मिळवले आहे. कंगनाचे फिल्म इंडस्ट्रीमध्ये कोणीच नसल्याने तिला अधिक संघर्ष करावा लागला. ज्याबद्दल ती नेहमी बोलत असते. 

Aug 9, 2017, 06:14 PM IST

सुश्मिताचा आई आणि भाऊ असा डबल रोल...

बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटीजनी सोमवारी रक्षाबंधन केले. अनेकांनी सोशल मिडियावर आपले फोटोज शेयर केले तर काहींनी भाऊ बहीण न भेटल्यामुळे सोशल मिडियावर दुःख व्यक्त केले. याच दरम्यान मंगळवारी मिस युनिव्हर्स सुश्मिता सेनने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून रक्षाबंधन सेलिब्रेशनचा एक व्हिडीओ शेयर केला आणि त्याचबरोबर एक इमोशनल मेसेज देखील लिहिला. व्हिडीओमध्ये सुश्मिता भावुक झालेली दिसत आहे. 

Aug 9, 2017, 01:10 PM IST

'बाहुबली' सिनेमाला 'या' सिनेमाचा रेकॉर्ड तोडण्यात अपयश

गल्लीपासून दिल्लीपर्यंत सर्वांनाच याडं लावलेल्या 'बाहुबली' सिनेमाला बॉलिवूडमधील एका सिनेमाचा रेकॉर्ड तोडण्यात अपयश आलं आहे.

Aug 8, 2017, 07:21 PM IST

सलमान खान या करतोय लहान मुलासोबत मस्ती...

अभिनेता सलमान खान अनेक कारणांनी प्रसिद्ध आहे.

परंतु, त्याचे लहान मुलांबद्दलचे प्रेम सर्वश्रुत आहे. याची प्रचिती देणारा अजून एक व्हिडीओ समोर आला. व्हिडीओमध्ये सलमान एका लहान मुलाबरोबर फायटिंग करताना दिसत आहे. हा लहान मुलगा दुसरा तिसरा कोणी नसून त्याचा भाचा आहिल आहे. सलमानला लहान मुलं आवडतात हे सगळ्यांनाच माहित आहे. पण आहिलशी असलेले त्याचे नाते काही खास आहे. व्हिडीओमध्ये आहिल देखील सलमानसोबत अगदी खुश दिसतोय.

Aug 8, 2017, 04:38 PM IST

रणबीर कपूरचा मस्क्युलर लूक संजय दत्तच्या बायोपिकसाठी नव्हे तर 'या' आगामी चित्रपटासाठी !

 संजय दत्तच्या बायोपिकसाठी रणबीर कपूरची निवड झाल्यानंतर त्यानेही व्यक्तीरेखेसाठी खूप मेहनत घ्यायला सुरवात केली आहे.

Aug 8, 2017, 03:28 PM IST

चित्रपटाची निर्मिती करताना प्रेक्षकांची आवड लक्षात घ्यायला हवी- अजय देवगण

लोकप्रिय अभिनेता आणि निर्माता अजय देवगण याचे असे म्हणणे आहे की, ''लोकप्रियता ही प्रेक्षकांच्या प्रेमावर आणि विश्वासावरच अवलंबून आहे. म्हणून कोणताही चित्रपट करण्यापूर्वी प्रेक्षकांची आवड, अपेक्षा आणि त्यांचा सल्ला लक्षात घेण्याला मी प्राधान्य देतो. अलीकडेच ट्यूबलाईट आणि जब हॅरी मेट सेजल हे दोन बहूचर्चित चित्रपट प्रेक्षकांना फारसे भावले नाहीत.''अजय देवगणचा आगामी चित्रपट 'बादशाहो' १ सप्टेंबरला प्रदर्शित होईल. त्यांचे अपयश लक्षात घेऊन अजय त्यांच्या आगामी  'बादशाहो' हा चित्रपट बनवताना कोणती काळजी घेतील ? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला.

Aug 8, 2017, 10:39 AM IST

अ‍क्षय कुमार उत्तरप्रदेशचा स्वच्छतादूत !

बॉलीवुड स्टार अक्षय कुमारला उत्तर प्रदेशच्या योगी सरकारने उघड्यावर शौच करण्याच्या सवयीपासून परावृत्त करण्यासाठी समाजात सजगता निर्माण करण्याचा मोहिमेचा एक भाग बनवला आहे.

Aug 4, 2017, 05:53 PM IST

या चित्रपटासाठी सुशांत आणि भूमी एकत्र !

सुशांत सिंह राजपूत लवकरच एका डाकूच्या भूमिकेत दिसणार आहे. इतकंच नाही तर त्याच्या या आगामी चित्रपटात भूमी पेडणेकर देखील आहे. खरंतर 'इश्किया',  'डेढ़ इश्किया' आणि  'उड़ता पंजाब' यांसारखे हिट चित्रपटाचे डिरेक्टर आपल्या आगामी चित्रपट चंबल या डाकूवर बनवत आहेत. मीडियाने दिलेल्या वृत्तानुसार या चित्रपटात भूमी आणि सुशांत रोमान्स करताना दिसतील. सुरुवातील हा चित्रपट या वर्षाच्या शेवटी प्रदर्शित होणार होता. परंतु, आता या चित्रपटाचे शूटिंग या वर्षाच्या शेवटी सुरु केले जाईल. त्यानंतर २०१८ मध्ये हा चित्रपट प्रदर्शित होईल.

Aug 4, 2017, 05:40 PM IST

'ए जेंटलमॅन' चित्रपटात सिद्धार्थ मल्होत्राचा डबल धमाका !

अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा 'ए जेंटलमॅन' या त्याच्या आगामी हिंदी चित्रपटासाठी फारच उत्सुक आहे.

Aug 2, 2017, 05:48 PM IST

अरबाज-मलायकाचा कायदेशीर काडीमोड...

 बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा आणि अरबाज खान हे आज कायदेशीर दृष्ट्या विभक्त झाले आहेत. आज मुंबईतील वांद्रे कोर्टाने त्यांच्या घटस्फोटाला मंजूरी दिली आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या नात्यांसंबंधी असलेली ओढाताण आता संपली आहे. 

May 11, 2017, 09:32 PM IST