Kolhapur Viral Video : जेलमधून सुटलेल्या गुंडांकडून चौघांना अमानुष मारहाण, दहशत कायम राहावी म्हणून...

Kolhapur News : सोशल मीडियावर एक मारहाणीचा धक्कादायक व्हिडीओ व्हायरल होतो आहे. या व्हिडीओमध्ये जेलमधून सुटलेल्या गुंडांकडून चौघांना अमानुष मारहाण करताना दिसत आहे. 

नेहा चौधरी | Updated: Jun 28, 2024, 09:33 AM IST
Kolhapur Viral Video : जेलमधून सुटलेल्या गुंडांकडून चौघांना अमानुष मारहाण, दहशत कायम राहावी म्हणून... title=
Kolhapur Viral Video gangsters released from jail Sham lakh brutal beating Four people goes viral on social media

Kolhapur Viral Video : 'पोलीस केस केली तर घरात येवून गोळ्या घालीन,'शाम लाखे' म्हणतात मला' असं सांगत जेलमधून सुटलेल्या गुंडांकडून चौघांना अमानुष मारहाण केलीय. इचलकरंजीत रेकॉर्डवरील गुन्हेगाराने चार मुलांना अमानुष मारहाण केल्याचा व्हिडीओ समोर आलाय. या गुन्हेगाराने खंडणीची मागणी करत मुलांचे अपहरण करून बंद खोलीत अमानुष मारहाण केलीय. तरुणाच्या मानेवर पाय ठेवून लोखंडी पाईपने जबर मारहाण केल्याने तरुण गंभीर जखमी झालाय. या मारहाण प्रकरणी सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. मोक्यातून सुटलेल्या रेकॉर्डवरील गुन्हेगार श्याम लाखेने मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल केलाय. आपली दहशत कायम राहावी यासाठी व्हिडीओ व्हायरल केल्याचं तपासात समोर आलंय.

काही जणांनी मुलांचे हात पाय धरले आणि अर्धनग्न अवस्थेत असणाऱ्या लाखे याने खाली झोपवून त्यांच्या मानेवर पाय ठेवून दोन्ही मांड्यांवर, हातावर, पायांच्या तळव्यांवर लोखंडी पाईपने जबरी मारहाण केल्याच या व्हिडीओमध्ये दिसत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर शहरात एकच खळबळ माजली आहे. 

पोलिसांनी याप्रकरणी लाखे याच्यासह त्याचे वडील, आदर्श उर्फ आद्या, माया, सुरज यांसह एकूण 7 जणांवर गुन्हा दाखल केलाय. या जीवघेण्या मारहाणीत रावसाहेब प्रकाश वडर (वय19) यांसह चार मुलं गंभीर जखमी झाली आहेत.