बॅडमिंटन

सायना नेहवाल जागतिक क्रमवारीत अव्वल

भारताची आघाडीची बॅडमिंटनपटू सायना नेहवाल जागतिक क्रमवारीत पुन्हा एकदा अव्वल स्थानावर आली आहे. सायनाने जागतिक अजिंक्‍यपद स्पर्धेत उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते.

Aug 21, 2015, 11:17 AM IST

रेकॉर्डब्रेक : विश्व चॅम्पियनशीप फायनलमध्ये सायनाची धडक

ऑलम्पिक कांस्य पदक विजेती सायना नेहवाल हिनं आज विश्व बॅडमिंटन चॅम्पियनशीपच्या फायनलमध्ये धडक मारलीय. यासोबतच ती या यशापर्यंत पोहचणारी पहिलीच भारतीय ठरलीय. शिवाय, तिनं  कमीत कमी आपलं रजत पदकही निश्चित केलंय. 

Aug 15, 2015, 10:28 PM IST

वर्ल्ड रँकिंगमध्ये सायना पुन्हा अव्वल स्थानी!

भारताची स्टार बॅडमिंटन खेळाडू सायना नेहवाल आज वर्ल्ड रॅंकिंगमध्ये पुन्हा अव्वल स्थानी पोहोचलीय. चीनची ली शुरूई तिसऱ्या स्थानी घसरल्यानंतर सायना पुन्हा पहिल्या नंबरवर पोहोचली.

Apr 16, 2015, 04:27 PM IST

मलेशियन ओपन : सायना नेहवालचा उपांत्य फेरीत पराभव

जागतिक क्रमवारीत अग्रस्थानी असलेली भारताची अव्वल बॅडमिंटनपटू सायना नेहवालला मलेशियन ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत पराभव पत्करावा लागला. त्यामुळे ती स्पर्धेतून बाहेर पडली.

Apr 4, 2015, 06:06 PM IST

भारताच्या 'फुलराणी’नं जिंकली ऑस्ट्रेलियन सुपर सीरिज

भारताची शटलर क्वीन सायना नेहवालने ऑस्ट्रेलिया सुपर सीरिजच्या विजेतेपदाला गवसणी घातलीय. सायनानं स्पेनच्या कॅरोलिना मरिनला 21-18, 21-11नं पराभूत करत विजेतेपद पटकावलं.

Jun 29, 2014, 12:15 PM IST

भारताची सिंधू बनली मकाऊ ओपन चॅम्पियन

भारताची टॉप सीडेड बॅडमिंटन प्लेअर पी. व्ही. सिंधू हिनं मकाऊ ओपनच्या विजेतेपदाला गवसणी घातली आहे. फायनलमध्ये सिंधूनं कॅनडाच्या लि मिचेलला पराभूत करत विजेतेपद पटकावलं.

Dec 1, 2013, 04:50 PM IST

आशियाई युवा बॅडमिंटन स्पर्धेत भारताला सुवर्ण पदक

मुंबईच्या चिराग शेट्टीने आशियाई युवा बॅडमिंटन स्पर्धेत दुहेरीचे विजेतेपद जिंकलं आहे. त्याने सहा वर्षांपूर्वीच्या प्राजक्ता सावंतच्या विक्रमाची बरोबरी करताना एम. आर. अर्जुनच्या साथीत सतरा वर्षांखालील मुलांच्या दुहेरीचे विजेतेपद पटकाविले. त्याचबरोबर भारताच्या सिरील वर्माने पंधरा वर्षांखालील एकेरीत बाजी मारली.

Oct 14, 2013, 03:40 PM IST

ज्वाला गुट्टाला हायकोर्टाकडून दिलासा

दिल्ली हायकोर्टाकडून बॅडमिंटनपटू ज्वाला गुट्टाला मोठा दिलासा मिळालाय. हायकोर्टानं ज्वालाला आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये खेळू द्यावं यासाठी भारतीय बॅडमिंटन असोसिएशन ऑफ इंडिया अर्थात ‘BAI’ नं परवानगी द्यावी असं सांगितलंय.

Oct 10, 2013, 03:11 PM IST

आता मुंबईतही ‘आयबीएल’ची धूम!

इंडियन बॅडमिंटन लीगचा धमाका आता मुंबईकरांना अनुभवता येणार आहे. आज आणि उद्या मुंबईत आयबीएलच्या लढती रंगणार आहेत. सायना नेहवाल, ज्वाला गुट्टा, अश्विनी पोनप्पा आणि ली चाँग वेई यासारख्या दिग्गज आणि ग्लॅमरस प्लेअर्सच्या लढतींची पर्वणी मुंबईकरांनासाठी असणार आहे. विशेष म्हणजे मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि बॉलिवूड सेलिब्रेटीही बॅडमिंटन कोर्टवर हजेरी लावणार आहे.

Aug 19, 2013, 02:47 PM IST

आजपासून `आयबीएल`ची टशन सुरू!

इंडियन प्रीमियर लीग अर्थाच आयपीएलच्या धर्तीवर इंडियन बॅडमिंटन लीगला आजापासून उत्साहात प्रारंभ होणार आहे. सायना नेहवाल विरुद्ध पी. व्ही. सिंधू असा मुकाबलाही या टूर्नामेन्टमध्ये रंगणार आहे.

Aug 14, 2013, 09:25 AM IST

भारताच्या पी. सिंधूने रचला इतिहास

भारताची बॅडमिंटन प्लेअर पी.व्ही.सिंधूने वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशिपच्या सेमी फायनलमध्ये धडक मारत मेडल निश्चित केल आहे. वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये मेडल निश्चित करणारी ती पहिली बॅडमिंटपटू ठरली आहे.

Aug 9, 2013, 06:22 PM IST

‘फुल’राणी सायना नेहवाल पराभूत

जागतिक बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीतच सायना नेहवालचा पराभव झाल्यानं स्पर्धेतलं तिचं आव्हानही संपुष्टात आलं. सायनाबरोबरच पी. कश्यपचाही पराभव झाल्याने तो स्पर्धेतून बाहेर पडला आहे.

Aug 9, 2013, 04:22 PM IST

सायना नेहवालचं फायनलचं स्वप्न भंगलं

भारतीय बॅडमिंटन स्टार सायना नेहवालचं ऑल इंग्लंड बॅडमिंटन चॅम्पियनशीपची फायनल गाठण्याचं स्वप्न पुन्हा भंगलं. सेकंड सीडेड सायनाला सेमी फायनलमध्ये थायलंडच्या रॅचनोक इन्थनॉनकडून पराभवाचा धक्का सहन करावा लागला.

Mar 10, 2013, 07:26 AM IST

ऑल इंग्लंड चॅम्पियनशिप: सायना सेमीफायनलमध्ये

भारताची अव्वल बॅडमिंटनपटू सायना नेहवालनं ऑल इंग्लंड चॅम्पियनशिपच्या सेमी फायनलमध्ये धडक मारलीय.

Mar 9, 2013, 10:30 AM IST

ग्लॅमरस 'ज्वाला'चा जलवा!

बॅडमिंटन स्टार ज्वाला गुट्टा टॉलीवूडमध्ये एन्ट्री करतेय. टॉलीवूडच्या एका चित्रपटात ज्वाला आपल्या डान्सचा जलवा दाखवणार आहे.

Feb 1, 2013, 01:05 PM IST