ज्वाला गुट्टाला हायकोर्टाकडून दिलासा

दिल्ली हायकोर्टाकडून बॅडमिंटनपटू ज्वाला गुट्टाला मोठा दिलासा मिळालाय. हायकोर्टानं ज्वालाला आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये खेळू द्यावं यासाठी भारतीय बॅडमिंटन असोसिएशन ऑफ इंडिया अर्थात ‘BAI’ नं परवानगी द्यावी असं सांगितलंय.

Aparna Deshpande Aparna Deshpande | Updated: Oct 10, 2013, 03:11 PM IST

www.24taas.com , झी मीडिया, नवी दिल्ली
दिल्ली हायकोर्टाकडून बॅडमिंटनपटू ज्वाला गुट्टाला मोठा दिलासा मिळालाय.
हायकोर्टानं ज्वालाला आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये खेळू द्यावं यासाठी भारतीय बॅडमिंटन असोसिएशन ऑफ इंडिया अर्थात ‘BAI’ नं परवानगी द्यावी असं सांगितलंय.
बीएआयनं लावलेल्या आजीवन बंदी विरोधात ज्वालानं हायकोर्टात धाव घेतली होती. इंडियन बॅडमिंटन लीग दरम्यान दिल्ली स्मॅशर्सकडून खेळताना ज्वालानं निषेध नोंदवल्यामुळं मॅचेस उशिरा सुरु झाल्या होत्या. यामुळं संघटनेनं तिच्यावर आजीवन बंदी घालण्याचा निर्णय घेतला होता.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.