प्रचार

नागपूरकर गडकरी फडकवणार दिल्लीत भाजपचा झेंडा?

दिल्ली विधानसभा निवडणुकीची जबाबदारी भाजपचे नेते नितीन गडकरींवर देण्यात आलीये. नितीन गडकरी सध्या कसा प्रचार करत आहेत, त्यांच्यासमोर काय आव्हानं आहेत, त्यांचा दिनक्रम कसा आहे. हे जाणून घेऊया...

Nov 30, 2013, 07:24 PM IST

सचिन स्वत:च घेईल निर्णय... - मुख्यमंत्री

निवृत्त झाल्यानंतर राजकारणात शिरून काय काम करायचं? याचा निर्णय सचिनच घेईल, असं सांगत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सचिनतर्फे बॅटींग केलीय.

Oct 22, 2013, 10:28 PM IST

राहुल गांधींचा नारा- `तीन-चार रोटी खाइए और कांग्रेस की सरकार लाइए`

राजस्थानातील उदयपूर येथील सलूंबर या आदिवासी शेतकरी मोर्चात काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी निवडणूक प्रचाराचा आरंभ केला. काँग्रेसला मतं देण्याबद्दल राहुल गांधींनी जनतेला आवाहन केलं.

Sep 11, 2013, 06:32 PM IST

मोदींचं नव्या ‘ABCD’द्वारं काँग्रेसवर टीकास्त्र...

राजस्थानची राजधानी जयपूर इथं आपल्या पहिल्या रॅलीला संबोधित करत गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस आणि केंद्रसरकावर टीकास्त्र सोडलं. राजस्थान निवडणुकीच्या प्रचाराचं मोदींनी रणशिंग फुंकलं. काँग्रेस सरकार आणि भ्रष्टाचार याची नवीन एबीसीडीच मोदींनी मांडली.

Sep 10, 2013, 03:32 PM IST

सोशल नेटवर्किंगच्या मैदानात काँग्रेसपेक्षा भाजप आघाडीवर

काँग्रेस आणि भाजपने फेसबुक, ट्विटर आणि यूट्युबवर आपापली अकाऊंट सुरू केली असून, त्या माध्यमातून तरूणाईपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न दोन्ही पक्षांनी सुरू केलाय.

Aug 5, 2013, 10:21 PM IST

राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रचार, दंगलीतल्या आरोपींचा संचार!

सांगली महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादीनं दंगलीतल्या आरोपींचा आधार घेतल्याचं दिसतंय. २००९ मध्ये सांगलीत दंगल भडकावणा-या आरोपींच्या प्रचारसभेस चक्क गृहमंत्र्यांनीच हजेरी लावत लांबलचक भाषणही ठोकलं तर दुसरीकडे मिरजेत दंगलीच्या आरोपीलाच सोबत घेवून कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी राष्ट्रवादी उमेदवारांच्या जाहीर सभा घेतल्या.

Jul 1, 2013, 05:31 PM IST

गृहमंत्री आर. आर. पाटील करणार गुन्हेगारांचा प्रचार?

सांगली महापालिका निवडणुकीसाठी स्टार प्रचारक म्हणून काम करणारे राज्याचे गृहमंत्री आर. आर. पाटील यांची राष्ट्रवादीच्या उमेदवारी यादीने गोची केली आहे. आजवर ज्यांना गृहमंत्र्यांच्या कार्यक्रमात स्टेजवरून खाली उतरविण्यात आले, अशा गुन्हे नोंद असलेल्या लोकांनाच उमेदवारी दिल्याने आता त्यांचाही प्रचार गृहमंत्र्यांना करावा लागणार आहे.

Jun 21, 2013, 11:23 AM IST

मोदींचा हाय-टेक 3 डी प्रचार

गुजरातमध्ये निवडणुकांचे पडघम वाजू लागले आहेत आणि प्रचाराचं रणशिंग फुंकलं गेलं आहे. काँग्रेस यावेळी विकासपुरूष नरेंद्र मोदींना शह देण्यासाठी जोरदार प्रचार करत आहेत. पण तरीही नरेंद्र मोदींनी नेहमीप्रमाणेच अनोख्या पद्धतीने आपला प्रचार करून लोकांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

Oct 28, 2012, 09:46 AM IST

अविनाश बागवेंना पोलिसांची धक्काबुक्की

पुण्यात काँग्रेसचे उमेदवार अविनाश बागवे यांनी पोलिसांनी धक्काबुक्की केल्याची तक्रार केली आहे. कासेवाडीतल्या प्रभाग क्र.६० मध्ये हा प्रकार घडला. अविनाश बागवे हे माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे यांचे पुत्र आहेत.

Feb 16, 2012, 01:38 PM IST

आज प्रचार तोफा थंडावणार

पालिका निवडणुकांचा प्रचार आता शिगेला पोचला आहे. आज संध्याकाळी प्रचाराची मुदत संपणार असल्यानं सर्वच पक्षांच्या उमेदवारांसह अपक्षांनीही जोरदार प्रचार सुरू केला आहे. शेवटच्या दिवशी जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोचता यावं यासाठी ‘रोड शो’वर उमेदवारांनी भर दिला आहे.

Feb 14, 2012, 03:50 PM IST

निवडणुकीतल्या प्रचारासाठी काँग्रेसचे क्लासेस !

निवडणुक जिंकण्यासाठी उमेदवार किंवा राजकीय पक्ष प्रचारात कुठलीच कसर ठेवत नाहीत. नागपुरमध्ये काँग्रेसच्या उमेदवारांना नेत्यांनी प्रचाराच्या टीप्स दिल्या. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नागपुरमध्ये काँग्रेसच्या नेत्यांनी उमेदवार आणि कार्यकर्त्यांसाठी क्लासेस घेतले.

Feb 10, 2012, 04:17 PM IST

पुण्याच्या चौकांत प्रचाराला बंदी

पुण्यात यंदा भर रस्त्यांत आणि चौकाचौकांमध्ये प्रचाराचा फड रंगणार नाही. प्रचारासाठी महापालिकेनं फक्त २५५ मैदानंच निश्चित करुन दिलीयत. त्यातून महापालिका उत्पन्नही मिळवणार आहे.

Jan 13, 2012, 08:35 PM IST