पैसे

बाबा रामदेव फसले; पैशाची देवाण-घेवाण चव्हाट्यावर

योग गुरू बाबा रामदेव आणि भाजपचे उमेदवार महंत चंदनाथ यांच्यातली पैशांची देवाण-घेवाण चव्हाट्यावर आलीय. खुद्द बाबा रामदेवांनीच ही पैशांची देवाण-घेवाणबद्दल माईकसमोर कथन केलीय... पण, अनावधानानं.

Apr 18, 2014, 12:43 PM IST

मतदारांना पैसे वाटणाऱ्या शेकाप कार्यकर्त्याला अटक

मावळ मतदार सघांत येणाऱ्या उरण तालुक्यात मतदानासाठी पेसे वाटप करणाऱ्या शेतकरी कामगार पक्षाचे पक्षाचे कार्यकर्ते महादेव घरत यांना अटक करण्यात आलीय.

Apr 18, 2014, 11:41 AM IST

काँग्रेसचे उमेदवाराच्या ऑफिसवर छापा, सांगलीत रोकड सापडली

काँग्रेसचे नागपूरचे उमेदवार विलास मुत्तेमवार यांच्या ऑफिसवर छापा पडलाय. निवडणूक आयोगानं ही कारवाई केलीय. नागपूरच्या ग्रेट नाग रोड परिसरातील ही घटना आहे. तर सांगलीत लाखोंची रोकड जप्त करण्यात आली आहे.

Apr 4, 2014, 01:38 PM IST

एटीएम कार्ड नसतांनाही पैसे काढता येणार

तुमच्याकडे एटीएम नसलं, तरी एटीएममधून पैसे काढणे आता शक्य होणार आहे. बँक ऑफ इंडियाने आपल्या ग्राहकांना ही सुविधा दिली आहे.

Mar 25, 2014, 11:37 PM IST

`जास्त पैसे मोजणार त्याचाच प्रचार करणार`

`मुंबई की ना दिल्ली वालों की पिंकी है पैसे वालों की...` असं म्हणणारी पिंकी आठवतेय का? ही `पैसेवालों की पिंकी` आठवण्याचं कारण म्हणजे मराठमोळी अभिनेत्री सई ताम्हणकरचं नुकतंच आलेलं एक वक्तव्य...

Mar 6, 2014, 10:15 PM IST

सावधान ! `भिशी` काढणाऱ्यांना आता कायद्याचा चाप

तुम्ही `भिशी` काढली आहे का? किंवा काढण्याची तयारी करत असाल तर सावधान. `भिशी` काढणाऱ्यांवर सावकारीविरोधी कायद्याअंतर्गत कारवाई करण्याचे संकेत राज्याचे गृहमंत्री आर आर पाटील यांनी दिले आहे. याची माहिती विधानसभेत त्यांनी दिली.

Feb 25, 2014, 06:25 PM IST

तुमच्याकडे एटीएम नसेल तरीही पैसे काढू शकता...

बॅँकेत खाते नसलेल्यांनाही एटीएमचा वापर मोबाईल तंत्रज्ञान वापरुन रोख रक्कम मिळवणं लवकरच शक्य होणार आहे. रिझर्व्ह बॅँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी हे स्पष्ट केलंय.

Feb 13, 2014, 08:13 AM IST

मोबाईलवर जाहिराती पाहा आणि पैसे मिळवा

मायक्रोमॅक्स आपल्या स्मार्ट फोनवर जाहिरात पाहण्याच्या बदल्यात पैसे देणार आहे. ही योजना मायक्रोमॅक्सचा आगामी फोन मायक्रोमॅक्स कॅनव्हॉस मॅड सोबत लागू होणार आहे. या सारखा प्लान या आधी टाटा डोकोमोने आणला आहे.

Jan 16, 2014, 10:33 AM IST

मी पैसे नाही, चांगला रोल शोधत असतो : आमीर

आमीर खानचा चित्रपट धूम - 3 परदेशातही जोरदार सुरू आहे. आमीर खानने कोणत्याही चित्रपटात काम केलं तरी, आमीरच्या फॅन्स आमीरकडून सर्वोत्तम परफॉर्मची अपेक्षा करतात.

Jan 6, 2014, 04:39 PM IST

फाटक्या, लिहिलेल्या नोटा तुमच्याकडे असतील तर...

नवीन वर्षात धक्कादायक बातमी पसरवली जात आहे. १ जानेवारी २०१४पासून काही मजकूर लिहिलेल्या नोटा आणि फाटकी नोट बॅंका स्वीकारणार नाही, असं म्हटलं जात आहे. मात्र, असं काही होणार नाही, असं रिझर्व्ह बॅंकेने स्पष्ट केलं आहे.

Jan 1, 2014, 12:02 PM IST

डॉक्टर, इंजिनिअर यांनी बोगस मजूर दाखवून पैसे लाटलेत

महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेमध्ये सांगली जिल्ह्यात आटपाडी तालुक्यातल्या शेटफळे इथे चक्क एक डॉक्टर आणि इंजिनिअर यांना `रोहयो`चे बोगस मजूर दाखवून पैसे लाटल्याची घटना उघडकीस आलीय. दीपक भोसले नावाचा व्यक्ती शेटफळे इथे मेडिकल प्रॅक्टिस करत आहे.

Dec 3, 2013, 12:54 PM IST

बारामतीत पतीने सोने-पैशासाठी पत्नीचे नाक, कान कापले

एक लाख रुपये आणि २ दोन तोळं सोन्यासाठी पतीनेच पत्नीचे केस कापल्याची अघोरी घटना बारामतीमधल्या डोर्लेवाडी गावात घडलीय. पत्नीचे केस कापण्यावर या नराधमाचं समाधान झालं नाही. त्यानं तिचे नाक आणि कान कापून जीवे मारण्याचाही प्रयत्न केला.

Dec 3, 2013, 12:24 PM IST

पुण्यातले बाल भिकारी चक्क कोट्यधीश!

पुण्यातले बाल भिकारी चक्क कोट्यधीश आहेत.... दानशूर पुणेकरांनी भिकाऱ्यांना एवढे पैसे दिलेत की त्यांची वार्षिक कमाई चक्क चार कोटींवर पोहोचलीय...

Nov 22, 2013, 09:31 AM IST

पुरुषांना इच्छा ‘डेट’वर महिलांनी खर्च करण्याची

डेटवर गेलात, पैसे कुणी भरले... पैसे कुणी भरावे हा काही नियम नाही. पण नेहमीच पुरुष पैसे भरतांना दिसतात. मात्र आता जवळपास ६४ टक्के पुरुषांना वाटतं की, आपण डेटवर गेलो असता आपल्या सोबत असलेल्या महिलेनं पैसे भरावेत. तर स्त्रियांकडून पैसे घेणं योग्य नाही, असं वाटणाऱ्यांची संख्याही काही कमी नाहीय.

Aug 11, 2013, 07:58 PM IST

मुंबईत पकडलेल्या ट्रकमध्ये अकरा कोटी

मुंबई सेंट्रल स्थानकाबाहेर टाकण्यात आलेल्या धाडीत हस्तगत झालेली रोकड केवळ ११ कोटी रूपयांची असल्याचे स्पष्ट झाले आहे. ट्रक पकडल्यानंतर आयकर विभागाने पैशांची मोजदाद सुरू केली होती, ती संपली. या ट्रकमध्ये २००० कोटी रूपये असल्याचे बोलले जात होते.

Jul 4, 2013, 11:30 AM IST